आता पोस्टाच्या खात्यातून थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येणार, केंद्र सरकारचा नवा प्लॅन तयार

आता पोस्टाच्या खात्यातून थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येणार, केंद्र सरकारचा नवा प्लॅन तयार

आता तुम्ही ज्या प्रामाणे एका बँकेतून, दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करता, तेवढ्याच सहजतेने पोस्ट खात्यातून बँक खात्यात देखील पैसे ट्रान्सफर करू शकरणार आहात. दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली आहे.

अजय देशपांडे

|

Mar 31, 2022 | 10:22 AM

तुम्हाला जर एक बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रन्सफर (Money Transfer) करायचे असतील तर तुम्ही आता ते अवघ्या काही मिनिटांमध्ये करू शकता. परंतु जर तुम्हाला तुमच्या पोस्ट खात्यातून (Post Office Account) बँकेच्या खात्यात (Bank Account) किंवा बँक खात्यातून पोस्टाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र लवकरच आता ही समस्या मार्गी लागणार आहे. सरकारने त्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली असून, आता तुम्ही ज्या प्रामाणे एका बँकेतून, दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करता, तेवढ्याच सहजतेने पोस्ट खात्यातून बँक खात्यात देखील पैसे ट्रान्सफर करू शकरणार आहात. दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली आहे. याबाबत बोलताना चौहान म्हणाले की, आता लवकरच बँक खात्यातून, पोस्ट खात्यात आणि पोस्ट खात्यातून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील. त्यासाठी एनएफटी, आरटीजीएस सारख्या सुविधा उपलब्ध करू देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

1,52,514 पोस्ट ऑफीस बँकिंग सुविधेच्या अंतर्गत

पुढे बोलताना कॅबिनेट राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी सांगितले की, देशभराती एकूण पोस्ट ऑफीस पैकी 1,52,514 टपाल कार्यालयांना बँकिंग सुविधांच्या अंतर्गत आणण्यात आले आहे. आता देशात केवळ 6,012 एवढेच पोस्ट ऑफीस आहेत, ज्या पोस्ट ऑफीसचा समावेश बँकिंग सुविधांच्या अंतर्गत अद्याप करण्यात आलेला नाही. मात्र लवकरच त्या टपाल कर्यालयांचा समावेश देखील बँकिंग सुविधेच्या अंतर्गंत करण्यात येईल. एनएफटी आणि आरटीजीएस सारख्या माध्यमातून नागरिकांना पोस्ट खात्यातून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता आले पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

पोस्टाच्या बचत योजनांना चांगला प्रतिसाद

सध्या पोस्ट बँकेचे जाळे देशभरात झपाट्याने विस्तारत असून, नागरिक देखील मोठ्या संख्येने पोस्ट पेमेंट बँकेचा लाभ घेताना दिसत आहेत. पोस्टाकडून सुरू करण्यात आलेल्या विविध बचत योजनांमधील गुंतवणूक देखील वाढली असून, हे टपाल खात्यासाठी सकारात्मक चित्र असल्याचे देखील यावेळी चौहान यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार

Petrol, Diesel Price: इंधन दरवाढ सुरूच; आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, …तर पॅन कार्ड चालूच राहणार मात्र भरावा लागणार दंड

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें