AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SIP की सुकन्या योजना? कोणता पर्याय मुलांच्या शिक्षणासाठी फायदेशीर? जाणून घ्या

बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, जे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी उभारण्यास मदत करू शकतात. यामध्ये दोन महत्त्वाचे पर्याय म्हणजे – म्युच्युअल फंडातील इक्विटी स्कीम (SIP च्या माध्यमातून गुंतवणूक) आणि सुकन्या समृद्धी योजना (मुलींसाठी सुरक्षित सरकारी योजना). या दोन्ही योजनांपैकी कोणता पर्याय अधिक सोईस्कर ठरेल ते पाहू.

SIP की सुकन्या योजना? कोणता पर्याय मुलांच्या शिक्षणासाठी फायदेशीर? जाणून घ्या
sukanya samriddhi yojana
| Edited By: | Updated on: Apr 20, 2025 | 7:57 AM
Share

पालक म्हणून आपण मुलांना उत्तम शिक्षण द्यावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजच्या महागाईच्या युगात हे स्वप्न सहजपणे पूर्ण करणं शक्य होत नाही. कारण उच्च शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस गगनाला भिडतोय. यावर एकच उपाय आहे – योग्य वेळेस गुंतवणुकीची सुरुवात. बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. पण आज आपण अशा दोन योजना पाहणार आहोत. ज्या मुलांच्या शिक्षणासाठी मजबूत आर्थिक आधार देऊ शकतात. म्युच्युअल फंडमधील SIP आणि सुकन्या समृद्धी योजना. चला पाहूया, या दोन्हीमध्ये नेमकं काय विशेष आहे.

SIP

Systematic Investment Plan म्हणजेच SIP ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची शिस्तबद्ध पद्धत आहे. यात दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप वळती जाते.

उदाहरणार्थ, जर तुम्ही दर महिन्याला 2000 रुपयात SIP मध्ये गुंतवता, तर एका वर्षात ₹24,000 आणि 20 वर्षांत ₹4.80 लाख इतकी गुंतवणूक करता येईल. यात सरासरी 12% वार्षिक परतावा गृहित धरला, तर 20 वर्षांनंतर तुमच्याकडे ₹18.40 लाखांचा फंड तयार होऊ शकतो – जो तुमच्या मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी मोठा हातभार लावेल.

सुकन्या समृद्धी योजना

जर तुमची मुलगी असेल, तर सुकन्या समृद्धी योजना हा सुरक्षित आणि सरकारमान्य पर्याय आहे. या योजनेत सध्या 8.1% वार्षिक व्याज दिलं जातं. सरकार या व्याजदरात वेळोवेळी बदल करत असते, पण रक्कम सुरक्षित असते.

या योजनेतही जर तुम्ही दर महिन्याला ₹2000 गुंतवणूक केली, तर 20 वर्षांत ₹4.80 लाख इतकी एकूण गुंतवणूक होईल. आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजासह 20 वर्षांनी तुमच्याकडे ₹11.59 लाखांचा फंड तयार होईल.

काय निवडाल? सुरक्षितता की उच्च परतावा?

SIP मध्ये बाजाराचा थोडासा धोका असला तरी दीर्घकाळात मिळणारा परतावा खूपच आकर्षक आहे. दुसरीकडे, सुकन्या योजना स्थिर आणि सुरक्षित असली तरी तिचा परतावा SIP इतका जास्त नाही. शेवटी, निर्णय तुमचाच – पण जर तुम्ही आजपासूनच नियोजन सुरू केलं, तर उद्या तुमच्या मुलाचं शिक्षण कुठेही अडणार नाही.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.