राष्ट्रीय बालिका बालदिनः आपल्या राजकुमारीचे भविष्य करा सुरक्षित; या पाच योजनांमध्ये करा गुंतवणूक

आज राष्ट्रीय बालिका बालदिन आहे. 2008 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधुन आपल्या राजकुमारीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याची तयारी करुयात. या पाच योजनांमध्ये केलेली गुंतवणूक तुमची परी मोठी झाल्यावर तिच्या भावी आयुष्यासाठी आर्थिक चणचण भासू देणार नाही. काही सुरक्षित आणि लोकप्रिय पर्यायांबद्दल जाणून घेऊयात.

राष्ट्रीय बालिका बालदिनः आपल्या राजकुमारीचे भविष्य करा सुरक्षित; या पाच योजनांमध्ये करा गुंतवणूक
INVESTMENT
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 10:54 AM

मुंबई : आज राष्ट्रीय बालिका बालदिन (National Girl Child Day) आहे. मुलींना (Girls) सर्वोपरी सशक्त करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे योग्य वेळी तिच्यासाठी आर्थिक पुंजीची तरतूद करणे हे सुजान पालक म्हणून आपले कर्तव्य आहे. तिचे शिक्षण, उच्च शिक्षण आणि लग्न यासाठी आर्थिक तरतूद करणे क्रमप्राप्त आहे. तिच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी पालक म्हणून आपण आतापासूनच चांगल्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तरच तिला योग्य वेळी ही रक्कम उपयोगी पडेल. त्यासाठी धावाधावा करण्याची गरज पडणार नाही. सध्या सुकन्या समृद्धी योजना, आवर्ती मुदत ठेव योजना व मुदत ठेव, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, एसआयपी द्वारे म्युचअल फंडात (Mutual Fund) केलेली गुंतवणूक, हे पालकांसमोरील गुंतवणुकीचे काही चांगले पर्याय आहेत. यातील कोणत्याही पर्यायात केलेली गुंतवणूक भविष्यात तुमच्या राजकन्येला नक्कीच उपयोगी पडेल.

सुकन्या समृद्धी योजना

मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी सरकारने २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील मुलींसाठी टपाल खाते अथवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत या योजनेचे खाते उघडता येईल. या योजनेत दोन मुलींच्या नावे एकाच बँकेत अथवा टपाल खात्यात या योजनेतंर्गत गुंतवणूक करता येईल. योजनेतंर्गत जास्तीत-जास्त दोन मुलींची खाते उघडता येतात. मात्र यामध्ये एक अपवाद देण्यात आला आहे. तुम्हाला जुळ्या मुली असतील त्यानंतर अथवा अगोदर मुलगी असेल तर अशा प्रकरणात तीनही मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळेल. किमान 250 रुपये आणि कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेतंर्गत करता येते. आई-वडिल अथवा कायदेशीर पालकाला मुलीच्या नावे खाते उघडता येईल. खाते उघडल्यापासून जास्तीत जास्त 14 वर्षांपर्यंत किंवा मूल 21 वर्षांचे होईपर्यंत समृद्धी खात्यात पैसे जमा करता येतात. मुलीची 21 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा लग्न झाल्यावर ही योजना परिपक्व होते. योजनेत 14 वर्षांत सरकारने जाहीर केलेल्या व्याजदरानुसार रक्कम जमा होते.

मुदत ठेव

भारतातील मुदत ठेवी हा बचतीसाठी सुरक्षित, सोपा आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो. आपण आपल्या मुलीसाठी मुदत ठेव (FD) सुरू करू शकता. बचत खात्यापेक्षा त्याला जास्त व्याज आहे. जर तुम्ही एकरकमी रक्कम जमा करून बचत करू शकत नसाल, तर तुम्ही आवर्ती ठेव (RD) बनवू शकता. आरडीचे मुख्य आकर्षण म्हणजे आपण दर महिन्याला एक रक्कम जोडू शकता. आपण वेगवेगळ्या बँकांच्या एफडी आणि आरडी दरांची तुलना करून आपल्या सोयीनुसार बँका आणि खाती निवडू शकता.अनेक वर्षे केलेली अर्थसाधना तुमच्या मुलीला योग्य वेळी आर्थिक पाठबळ देऊ शकते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र(National Savings Certificate) ही सामाजिक उत्तरदायित्व भावनेतून सरकारने उचललेले पाऊल आहे. ठराविक मुदतीसाठी या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करता येते. टपाल खात्यात या योजनेची संपूर्ण माहिती मिळते. या योजनेत सध्या 5 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी 6.8 टक्के वार्षिक व्याजाने परतावा मिळतो. या योजनेत कमीत कमी 1000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा आखून देण्यात आली नाही. कोणताही भारतीय नागरीक टपाल खात्यात जाऊन या योजनेत गुंतवणूक करु शकतो. 10 वर्षाच्या मुलीसाठी तिचे आई-वडील, कायदेशीर पालक यांना खाते उघडता येते. विशेष म्हणजे या योजनेत केलेली गुंतवणूक ही आयकर खात्याच्या 80 सी नियमानुसार, कर सवलतीस पात्र असते.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड

पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेतील गुंतवणूक ही कर सवलतीस पात्र आहे. लहान वयाच्या मुलीच्या नावे पण या योजनेत खाते उघडता येते. सध्या या योजनेत 7.1 टक्के वार्षिक व्याजदराने परतावा मिळतो. एका आर्थिक वर्षात या योजनेत कमीत कमी 500 ते कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते. पीपीएफ खाते टपाल कार्यालय अथवा बँकेत उघडता येते. पीपीएफ खात्यात 15 वर्षांच्या कालावधीची मर्यादा आहे. काही आवश्यक परिस्थितीत कालावधी पूर्ण होण्याअधीच खाते बंद करता येते. तसेच त्याची मुदत पुढे पाच वर्षे वाढविता येते.

म्युच्युअल फंड

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे केलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने अनेकांना मालामाल केलेले आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी अर्थसल्लागार आणि तुमचा अभ्यास महत्वाचा आहे. म्युच्युअल फंड नेमका कोणत्या उद्देशाने तुम्ही घेत आहात, याचा निर्णय झाला तर लक्ष साध्य करण्यासाठी कितीचा एसआयपी निश्चित करावा हे समोर येते. या योजनेत जोखीम असल्याने अभ्यास करुनच गुंतवणूक करावी . फंडाचे अनेक प्रकार असतात आणि त्यातील धोकेही तसे असतात. त्यामुळे गुंतवणूक करताना तुम्ही अलर्ट असणे गरजचे असते.

इतर बातम्या :

HDFC Bank FD : मुदत ठेवीवर चक्क खरेदी व्हाऊचर!, 7,500 रुपयांच्या एफडीवर मिळेल 7,500 रुपयांचे कुपन

Start Up | गेल्या वर्षांत तब्बल 2.57 लाख कोटींचा पतपुरवठा, व्हेंचर कॅपिटलमुळे यंदा 50 उदयोन्मुख कंपन्यांना अर्थपुरवठा

वर्ष 2022 ‘टाटागिरी’चं: उत्पादनात वाढ ते इलेक्ट्रॉनिक गाड्यांना वेटिंग, टाटा मोटर्सचा आत्मविश्वास!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.