AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईतक्या रुपयांपेक्षा कमी चोरीवर पोलिस करणार नाहीत कारवाई ! काय आहे नवा कायदा?

चोरी हा कायद्याने गुन्हा आहे. पण भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 नुसार, जर चोरी ईतक्या रुपयांपेक्षा कमी असेल, तर पोलिस कारवाई करणार नाहीत. अशा प्रकरणात पोलिस FIR दाखल करत नाहीत आणि तक्रारदाराला थेट परत पाठवतात. हा नवा कायदा काय आहे आणि यात तुमचे पर्याय काय आहेत, जाणून घ्या.

ईतक्या रुपयांपेक्षा कमी चोरीवर पोलिस करणार नाहीत कारवाई ! काय आहे नवा कायदा?
| Edited By: | Updated on: May 10, 2025 | 3:46 PM
Share

घराच्या बाहेर ठेवलेली सायकल चोरीला गेली,  दुकानातून एखादी वस्तू गायब झाली. किंमत ५ हजारांपेक्षा कमी. तुम्ही तक्रार दाखल करायला, पोलिस ठाण्यात जाता, पण पोलिस सांगतात “असं काही आमच्याकडे येत नाही!” हे ऐकून तुम्हाला राग येतो, पण ते कायद्याच्या कक्षेत बोलत असतात. कारण आता नवीन कायद्यानुसार, 5 हजार रुपयांखालील चोरी हा गैरगंभीर गुन्हा मानला जातो आणि त्यावर थेट FIR होत नाही.

काय आहेत नियम?

भारतीय न्याय संहिता 2023 च्या धारा 303(2) नुसार, 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीची चोरी ही असंज्ञेय (non-cognizable) गुन्हा मानली जाते. याचा अर्थ असा, की अशा छोट्या चोरीच्या तक्रारीवर पोलिस थेट FIR दाखल करत नाहीत. मध्य प्रदेशात नुकतंच एक प्रकरण समोर आलं. एका व्यक्तीने 125 रुपयांच्या रसगुल्ल्यांच्या चोरीची तक्रार केली. पण पोलिसांनी हा कायदा सांगत तक्रार रद्द केली. अशा प्रकरणांना गैरगंभीर गुन्हा मानलं जातं. त्यामुळे पोलिस कारवाई टाळतात.

काय करू शकता?

जर तुमच्यासोबत 5000 रुपयांपेक्षा कमी रकमेची चोरी झाली आणि पोलिस कारवाई करत नसतील, तर निराश होऊ नका. तुम्ही थेट मजिस्ट्रेट न्यायालयात तक्रार दाखल करू शकता. जर न्यायालयाने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले, तर पोलिसांना तपास करावा लागेल. या कायद्यानुसार, चोराला चोरी केलेली वस्तू परत करण्याचा किंवा नुकसानाची भरपाई करण्याचा पर्याय दिला जातो. न्यायालय त्याला तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकत नाही. त्याऐवजी सामुदायिक सेवा (जसे की रस्त्याची स्वच्छता) करण्याची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

कायदा कसा काम करतो?

भारतीय न्याय संहिता 2023 हा 1 जुलै 2024 पासून लागू झाला. याने भारतीय दंड संहिता (IPC) ची जागा घेतली. या कायद्यात छोट्या गुन्ह्यांना सामुदायिक सेवेची शिक्षा देण्यावर भर आहे. उदाहरणार्थ, पहिल्यांदा 5000 रुपयांपेक्षा कमी चोरी करणाऱ्याला वस्तू परत केल्यास तुरुंगात जावं लागत नाही. यामुळे न्यायालय आणि पोलिसांवरील ताण कमी होतो आणि छोटे गुन्हे करणाऱ्यांना सुधारण्याची संधी मिळते.

Follow Us
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक....
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक.....
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल.
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत.
साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे
साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून...
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून....
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात अपडेट: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची पार्टीला हजेरी.