पेन्शनची टेन्शन संपणार! एनपीएसकडून योजनेत मोठ्या बदलाची तयारी, निवृत्तीपर्यंत खात्यात जमा होणार कोट्यवधींचा फंड
new pension scheme: पेन्शन नियामकाने इक्विटीमधील गुंतवणूक आणखी 10 वर्ष वाढवल्यामुळे गुंतवणूकदास शेअर बाजारातील फायदा घेता येणार आहे. यामुळे जास्त रिटर्न मिळणार आहे. एनपीएसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना वयाच्या 45 वर्षापर्यंत इक्विटी फंडात अधिक गुंतवणुकीचा फायदा होणार आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. एनपीएसच्या योजनेत मोठ्या बदलाची तयारी पेन्शन कोष नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (पीएफआरडीए) करण्यात येत आहे. यामुळे निवृत्तीनंतर जास्त पैसा पेन्शन धारकांच्या हातात येणार आहे. तसेच एनपीएस गुंतवणुकीतून जास्त रिटर्न मिळणार आहे. या योजनेत एक्विटीचा वाटा वाढवण्याची तयारी करण्यात येत आहे. युवकांमध्ये पेन्शन स्कीम आकर्षक बनवण्यासाठी ‘न्यू बॅलेंस्ड लाइफ सायकल फंड’ तयार आणण्यात येणार आहे.
काय आहे योजना
पीएफआरडीएच्या योजनेअंतर्गत, इक्विटी फंडांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पैसे गुंतवले जाणार आहेत. या योजनेत पेन्शनधारक 45 वर्षांचा झाल्यावर इक्विटी गुंतवणुकीत हळूहळू कमी होईल. ही कपात गुंतवणुकदाराच्या वयाच्या 35 पासून सुरू होते. या योजनेत सामील होणाऱ्या भागधारकांना 45 वर्षे वयापर्यंत इक्विटी फंडांमध्ये अधिक गुंतवणूक करता येणार आहे. त्यानंतर इक्विटीमधील गुंतवणूक कमी करण्यात येणार आहे. यामुळे त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत चांगला निधी तयार करण्यास मदत होईल.
काय आहे योजना
पेन्शन नियामकाने इक्विटीमधील गुंतवणूक आणखी 10 वर्ष वाढवल्यामुळे गुंतवणूकदास शेअर बाजारातील फायदा घेता येणार आहे. यामुळे जास्त रिटर्न मिळणार आहे. एनपीएसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना वयाच्या 45 वर्षापर्यंत इक्विटी फंडात अधिक गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. यामुळे सेवानिवृत्तीपर्यंत त्याच्या खात्यात जास्त फंड जमा होणार आहे.
कधी येणार योजना
पेन्शन कोष नियामक आणि विकास प्राधिकरणाचे चेयरमन दीपक मोहंती यांनी सांगितले की, आम्ही इक्विटमध्ये अधिक गुंतवणूक करणारा नवीन बॅलेंस्ड लाइफ सायकिल फंड जुलै ते सप्टेंबरपर्यंत घेऊन येणार आहोत. एनपीएसमध्ये इक्विटीचा पर्याय निवडणाऱ्यांना दीर्घ काळ गुंतवणूक करता येणार आहे. तसेच जोखीम आणि रिटर्न यांचे संतुलन राहणार आहे. अटल पेन्शन योजनेत सन 2023-24 या आर्थिक वर्षात 1.22 लाख नवीन पेन्शनधारक आले आहेत. पेन्शन कोष नियामक आणि विकास प्राधिकरणानुसार, अटल पेन्मशन योजनेमध्ये सामील होणाऱ्या एकूण भागधारकांची संख्या जून 2024 पर्यंत 6.62 कोटी पार करणे अपेक्षित आहे.
