AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेन्शनर्ससाठी गूड न्यूज: आता 1 तारखेची वाट कशाला, महिन्या संपण्याआधीच खात्यात पेन्शन !

रिझर्व्ह बँकेच्या (RESERV BANK OF INDIA) निर्देशानुसार पेन्शन महिन्याच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी जमा व्हायलाच हवी असे निर्देश दिले आहेत.

पेन्शनर्ससाठी गूड न्यूज: आता 1 तारखेची वाट कशाला, महिन्या संपण्याआधीच खात्यात पेन्शन !
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 8:56 AM
Share

नवी दिल्ली- कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेच्या (Employee Pension Scheme) पेन्शनर्ससाठी महत्वाची बातमी आहे. आता EPS निवृत्ती पेन्शनर्सना वेळेवर पेन्शन मिळणार आहे. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या तारखेला पेन्शनर्सच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येईल. कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) कडे EPS वेतनधारकांना वेळेत पेन्शन मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत होते. मोठ्या प्रमाणावर आर्थिक कोंडी होत होती. पेन्शन तारखेच्या अनियमिततेवर ईपीएफओनं (EPFO) कठोर पाऊल उचललं आहे. EPS पेन्शनर्सच्या अडचणी दूर करण्यासाठी ईपीएफओने 13 जानेवारी 2022 रोजी एक परिपत्रक जारी केले. पेन्शन विभागाद्वारे तक्रारींची छाननी करण्यात आली आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या (RESERV BANK OF INDIA) निर्देशानुसार पेन्शन महिन्याच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी जमा व्हायलाच हवी असे निर्देश दिले आहेत.

सर्व EPS निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यात महिन्याच्या सुरुवातीलाच पेन्शन दिली जाते. मात्र, अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर उशीर होत होता. नव्या निर्णयामुळे पेन्शन वेळेवर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या निर्णयासाठी मार्च महिन्याचा अपवाद असेल. मार्च महिन्यासाठी एक एप्रिल नंतर पेन्शन खात्यात जमा केली जाईल.

निर्णयाची 100 टक्के अंमलबजावणी

ईपीएफओने बँकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश जारी केले आहेत. पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांकडे पेन्शनची रक्कम वितरण तारखेपूर्वी केवळ दोन दिवस आधीच वर्ग करावी असे परिपत्रकात म्हटले आहे. आपल्या सर्व विभागीय कार्यालयांना आपल्या कार्यक्षेत्रातील बँकात पेन्शन महिन्याअखेर जमा होत असल्याची खात्री करावी असे ईपीएफओने म्हटले आहे.

ईपीएस म्हणजे काय?

भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. वीसहून अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी आणि त्याची मालक आस्थापना दरमहा मूळवेतनाच्या बारा टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात. या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ देण्याबरोबरच दोन अतिरिक्त लाभही आहेत. त्यामध्ये निवृत्तीवेतन योजनेचा समावेश होतो. दर महिन्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाते.

इतर बातम्या :

बँकिंगमध्ये व्याज दरवाढीची लाट: जाणून घ्या- SBI, HDFC आणि कोटक महिंद्राचे नवे दर

पझेशनसाठी बिल्डर टाळाटाळ करतोय? मग ही बातमी वाचाच! ताब्यास विलंब, बिल्डरला ग्राहक आयोगाचा दणका

प्रवासासाठी निघालात, रिचार्ज, बील भरण्याची चिंता नको; रेल्वे स्थानकावरच भरा बील, रेलटेलचा अनोखा उपक्रम

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....