AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धजन्य परिस्थितीतही सरकारी योजनांचे पैसे मिळत राहतात का? जाणून घ्या..

जेव्हा देशात युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा सरकारी कल्याणकारी योजनांचे पैसे जनतेला मिळत राहतात का, असा प्रश्न अनेकांना पडतो. भारतात याबद्दल स्पष्ट नियम कोणते आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात..

युद्धजन्य परिस्थितीतही सरकारी योजनांचे पैसे मिळत राहतात का? जाणून घ्या..
'ऑपरेशन सिंदूर'ची पोस्ट शेअर करत अदनानने 'जय हिंद' असं लिहिलंय आणि त्याचसोबत भारताच्या झेंड्याचा इमोजी पोस्ट केला आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या 14 दिवसांनंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. Image Credit source: Instagram
| Updated on: May 08, 2025 | 2:34 PM
Share

देशाच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण असतानाही गावांमध्ये मनरेगा अंतर्गत पैसे अजूनही खात्यात येत आहेत, उज्ज्वला योजने अंतर्गत सिलेंडर पुन्हा भरले जात आहेत आणि शेतकरी सन्मान निधी अंतर्गत हप्ते हस्तांतरित केले जात आहेत. आता प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा सरकारी कल्याणकारी योजनांचे पैसे जनतेच्या खात्यात जमा होत राहतात का? याबद्दल भारतात काही स्पष्ट नियम आहेत.

नियम काय आहेत?

युद्ध झाल्यास सर्व योजना आपोआप बंद होतील अशा कोणत्याही विशेष आणीबाणीच्या तरतुदीचा उल्लेख खरंतर भारतीय संविधान आणि शासन व्यवस्थेत नाही. जर राष्ट्रीय आणीबाणी (कलम 352) लागू करण्यात आली तर काही अधिकारांवर बंधनं आणता येतात. परंतु प्रशासनाच्या इच्छेनुसार योजना सुरू राहू शकतात.

कलम 352 म्हणजे काय?

भारतीय संविधानाच्या कलम 352 अंतर्गत राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार संविधानातील अनेक तरतुदी रद्द करू शकतात. यामुळे भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार निलंबित करता येतात. त्याचप्रमाणे संघराज्य बनवणाऱ्या राज्यांना अधिकाऱ्यांचं हस्तांतरण नियंत्रित करता येतं.

युद्ध झाल्यास सरकार कोणती पावलं उचलू शकतं?

संकटाच्या काळात सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळत राहावा आणि समाजात असंतोष पसरू नये अशी सरकारची इच्छा असते. 1962 च्या चीन युद्ध, 1965 आणि 1971 च्या पाकिस्तान युद्धातही गरीबांसाठी रेशन व्यवस्था, पेन्शन आणि इतर योजना चालू राहण्याचं हेच मुख्य कारण आहे. पुरवठा खंडित झाल्यामुळे काही क्षेत्रांवर परिणाम होतो. परंतु केंद्रीय तिजोरीतून येणारा पैसा थांबत नाही. परंतु हेसुद्धा खरं आहे की युद्धाची तीव्रता आणि व्याप्ती जसजशी वाढत जाते, तसतसे प्रशासनाचे प्राधान्यक्रम बदलतात. जर एखाद्या भागात मोठ्या प्रमाणात विनाश झाला किंवा सैन्याने ताबा घेतला तर स्थानिक संस्था किंवा जिल्हा प्रशासन नियोजनाचं काम थांबवू शकतं. पण ही काही कायमची बंदी नसते. परिस्थिती पुन्हा सामान्य होताच योजनांचे पैसे पुन्हा खात्यात जमा केले जातात.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर गुरुवारी पाकिस्तानातील 12 शहरांमध्ये 25 ड्रोन हल्ले झाले आहेत. लाहोरच्या सैन्य ठिकाणांजवळ हे ड्रोन ब्लास्ट झाले आहेत. या ड्रोन स्फोटांवरुन पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम पूर्ण फेल ठरल्याचं दिसत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.