पॅनकार्ड-आधार लिंक नसल्यास अडचणीत याल, सेबीकडून गुंतवणुकदारांना निर्वाणीचा इशारा

Pan Aadhaar | त्यानुसार गुंतवणुकदारांना पॅनकार्ड आणि आधार लिकिंगची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागणार आहे. ज्या नागरिकांचे आधारकार्ड 2 जुलै 2017 पूर्वी तयार करण्यात आले होते, त्यांना या गोष्टीची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.

पॅनकार्ड-आधार लिंक नसल्यास अडचणीत याल, सेबीकडून गुंतवणुकदारांना निर्वाणीचा इशारा
पॅनकार्ड आधार लिंकिंग
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 6:32 AM

मुंबई: पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी केंद्र सरकारकडून 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत पॅनकार्ड आधारशी न जोडल्यास पॅनकार्ड रद्द होईल. प्रत्यक्ष कर विभागाने (CBDT) यासंदर्भातील निर्देश जारी केले होते. त्यानंतर आता भांडवली बाजाराचे नियमन करणाऱ्या ‘सेबी’कडूनही गुंतवणुकदारांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

त्यानुसार गुंतवणुकदारांना पॅनकार्ड आणि आधार लिकिंगची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागणार आहे. ज्या नागरिकांचे आधारकार्ड 2 जुलै 2017 पूर्वी तयार करण्यात आले होते, त्यांना या गोष्टीची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.

पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?

जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय टॅक्स रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

पॅन-आधार लिंकिंग स्टेटस चेक कसे कराल?

– यासाठी तुम्हाला www.incometaxindiaefiling.gov.in/aadhaarstatus ला भेट द्यावी लागेल – येथे तुम्हाला पॅन आणि आधार क्रमांक टाकावा लागेल – आता ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा – पुढील स्क्रीनवर तुम्हाला लिंकिंग स्टेटस दिसेल

कोणत्याही पुराव्याची गरज नाही

आधारला पॅनशी जोडण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. यासाठी फक्त आधार आणि पॅन द्यावा लागेल. तथापि, दोन्ही कागदपत्रांमध्ये दिलेली माहिती एकमेकांशी जुळली पाहिजे तरच लिंकिंग यशस्वी होईल. यात काही अडचण असल्यास, लिंकिंगचे काम पूर्ण होणार नाही. कधीकधी ‘आयडेंटिटी डेटा मिसमॅच’ चा मेसेज लिंक करताना येतो. याला एक विशेष कारण आहे.

पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आधार आणि पॅन लिंक करणे यशस्वी होते. यासाठी आधार आणि पॅनचा डेटाबेस जुळवला जातो. जर सिडिंग प्रक्रियेत कोणतीही माहिती चुकली असेल किंवा नाव, वाढदिवस, लिंग यात काही फरक असेल तर वापरकर्त्याला ‘आयडेंटिटी डेटा मिसमॅच’ चा मेसेज येऊ शकतो. हे सुधारण्यासाठी, लिंकिंगमध्ये दिलेली माहिती जोडली गेली पाहिजे आणि ती योग्यरित्या तपासली गेली पाहिजे.

संबंधित बातम्या:

WhatsApp Banking ने व्यवहार आणखी सोपे, चॅटिंगद्वारे बँकेची 10 कामं शक्य!

आधारकार्ड घरी विसरलात? आता स्मार्टफोनमध्येच ठेवा आधारकार्ड, कसे कराल डाऊनलोड

Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना, फक्त 50 हजार गुंतवा आणि 3300 रुपये मासिक पेन्शन मिळवा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.