AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Price Update : सर्वसामान्यांना केंद्र सरकारचे एप्रिल फुल! एलपीजी सिलेंडरचा दिलासा कोणाला?

LPG Price Update : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना एप्रिल फुल केले. घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी होतील, अशी आशा ग्राहकांना होती. पण ही आशा फोल ठरली. यांना मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी दिलासा दिला.

LPG Price Update : सर्वसामान्यांना केंद्र सरकारचे एप्रिल फुल! एलपीजी सिलेंडरचा दिलासा कोणाला?
दिलासा नाहीच
| Updated on: Apr 01, 2023 | 9:15 AM
Share

नवी दिल्ली : सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने एप्रिल फुल केले. नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या नवीन आर्थिक वर्षात कमी होतील, अशी आशा होती. पण त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. घरगुती सिलेंडरच्या किंमतीत ( LPG cylinders) कुठलाही दिलासा देण्यात आला नाही. 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. पेट्रोलियम कंपन्या (Petroleum Companies) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी, एटीएफ आणि इतर उत्पादनांच्या आढाव्यानंतर किंमती जाहीर करतात. या किंमतीत महिनाभरासाठी बदल करण्यात येतो. त्याचा सर्वसामान्य नागरिकांवर थेट परिणाम होतो.

व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कपात

पेट्रोलियम कंपन्यांनी आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कंपन्यांनी कपात केली. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात 92 रुपयांची कपात ( LPG Price Reduced) करण्यात आली. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई यासह सर्वच शहरात गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्याचा फायदा हॉटेल चालकांपासून, गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांसाठी होईल.

जनतेची घोर निराशा

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पेट्रोलियम कंपन्यांनी कुठलाही दिलासा दिला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची मोठी निराशा झाली. गेल्या महिन्यात कंपन्यांनी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली होती. ही वाढ जैसे थे आहे. दिल्ली घरगुती गॅस सिलेंडरचा भाव 1103 रुपये प्रति सिलेंडर आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत गेल्या महिन्यात 50 रुपयांची वाढ झाली होती. तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव 350 रुपयांनी महागले होते.

चार वर्षांत दरवाढीचा शॉक

या वर्षात पहिल्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पु्न्हा 50 रुपयांची वाढ झाली. 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत (LPG Cylinder Price) आता 1,103 रुपयांपर्यंत पोहचली आहे. गेल्या चार वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमतीत 56 टक्के दरवाढ झाली आहे. यापूर्वीच्या किंमतींवर नजर टाकली असता, सध्या 1100 रुपयांच्या आताबाहेर एक गॅस सिलेंडर मिळत आहे.

अशा वाढल्या किंमती

पूर्वी एवढ्याच किंमतीत दोन गॅस सिलेंडर येत होते. 1 एप्रिल, 2019 रोजी घरगुती 14.2 किलोग्रॅम गॅस सिलेंडरची किंमत 706.50 रुपये होती. 2020 मध्ये हा दर 744 रुपये झाला. 2021 मध्ये पुन्हा भावात वृद्धी झाली. गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये झाली. 2022 मध्ये एका गॅस सिलेंडरची किंमत 949.50 रुपये झाली. गेल्या काही वर्षात एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे गॅस सबसिडी (Subsidy on LPG) अत्यंत कमी झाली. चार रुपयांच्या घरात ही रक्कम जमा होत असल्याने सर्वांची थट्टा झाली.

मोठ्या शहरातील नवीन दर

दिल्ली- 2028.00 कोलकाता- 2132.00 मुंबई- 1980.00 चेन्नई- 2192.50

मोठ्या शहरातील जुने दर

दिल्ली- 2119.50 कोलकाता 2221.50 मुंबई 2071.50 चेन्नई 2268.00

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.