हिरोगिरी पडू शकते महागात, रेल्वेची स्पीड वाढवली, एका मिनिटात रेल्वे कापणार 2 किमीचे अंतर, ट्रॅकजवळ जाणे बेतू शकते तुमच्या जीवावर

काही ताशी धावणा-या रेल्वे गाड्यांची गती आता आणखी वाढविण्यात आली आहे. रेल्वे फाटकाजवळ अनेक जण हिरोगिरी करता, फाटकाखालून गाडी काढत ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करतात. असे भलते धाडस अंगलट येऊ शकते. तेव्हा ट्रॅकपासून ठराविक दुरीच यातून तुम्हाला वाचवू शकते. 

हिरोगिरी पडू शकते महागात, रेल्वेची स्पीड वाढवली, एका मिनिटात रेल्वे कापणार 2 किमीचे अंतर, ट्रॅकजवळ जाणे बेतू शकते तुमच्या जीवावर
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 8:59 AM

रेल्वेने जवळपास अनेक गाड्यांची गती(Speed) वाढवली आहे. या निर्णयामुळे शहाण्याने ट्रॅकच्या आजुबाजूला भटकू नये अथवा सिग्नल पडलेले असताना ट्रॅक ओलांडण्याचा वेडेपणा करु नये. नाहीतर या धाडसात तुम्ही जीव ही गमावून बसाल. सुपरफास्ट(Superfast) ट्रेन आता 130 किमी प्रति तास या वेगाने धावणार आहे. रेल्वे रुळ ओलांडता यावा यासाठी जागोजागी रेल्वेने फाटकांची व्यवस्था केलेली आहे. देशभरात अनेक ठिकाणी ही व्यवस्था आहे. परंतू, शेतातून जाणा-या, द-या, खो-यातून, बोगद्यातून, जंगलातून ट्रॅकवरुन रेल्वे धावताना याठिकाणी सुरक्षेचे व्यापक धोरण अवलंबिले जात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जनावरे, माणसे रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी होतात अथवा प्राण गमवतात.

गाव, वस्ती भागात अनेक ठिकाणी मोकळ्या जागेतून लोक बिनधास्त रेल्वे रुळ क्रॉस करतात. याठिकाणी रेल्वेकडून सुरक्षेची काळजी घेतली जाते. मात्र अनेकदा ट्रेन येत असतानाही लोक रुळ ओलांडण्याचे भलतेच धाडस दाखवितात. रेल्वे रुळाशेजारीच झोपड्या टाकल्या जातात. अनाधिकृत रस्ते तयार करण्यात येतात. पळवाटा काढण्यात येतात. सुरक्षाभिंतींना भगदाड पाडून शॉर्टकट रस्ता तयार करण्यात येतो. आता रेल्वेचा स्पीड वाढविल्याने अशा ठिकाणी लोकांनी काळजी न घेतल्यास भीषण अपघात होऊ शकतो. त्यात एकाद्याला प्राण गमवावे लागू शकतात किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते.

सावध रहा

लोकांच्या या अवैध गतिविधींना अटकाव करण्याचा अनेकदा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत असते. मात्र अनेक ठिकाणी पटकन दुस-या ठिकाणी जाण्यासाठी वळण रस्ता, दादरा, पादचारी पुल, भुयारी मार्ग याचा वापर न करता, नागरिक बिनदिक्तपणे रेल्वे रुळ ओलांडतात. अशा ठिकाणांची ओळख पटवून जवळच्या मार्गाने जाण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचविण्यासाठी रेल्वेनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. अनेक भागात भुयारी मार्ग, पादचारी पुलांचे काम जोरात सुरु आहे. रेल्वे फाटकाजवळ व्यक्ती तैनात करण्यात आले आहे. तर अवैधरित्या रेल्वे क्रॉसिंगचे पाऊंट हुडकून रेल्वे विभागाने अशा  ठिकाणी प्रतिबंध आणि उपायांवर भर दिला आहे.

रेल्वे फाटकाचाच वापर करा

रेल्वे रुळ ओलांडताना सुनिश्चित केलेल्या रेल्वे फाटकाच्या तिथूनच रुळ ओलांडणे चांगले असते. याठिकाणी रेल्वे येण्याची माहिती फाटक बंद असल्याने मिळते. गेट बंद असताना नाहक गेट खालून निघून जाण्याची घाई जीवावर बेतू शकते हे मात्र लक्षात ठेवावे. आता ट्रेनचा स्पीड वाढविल्याने रेल्वे प्रतिमिनिट 2 किलोमीटरचे आंतर कापते. त्यामुळे तुमची थोडीशी हयगई महाग पडू शकते.

संबंधित बातम्या : 

VIDEO | पिंपरीत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड, राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यावेळीच प्रकार

Bailgada Sharyat | बैलगाडा शर्यतींची परंपरा स्पेनमधून महाराष्ट्रात कशी आली? जाणून घ्या रंजक गोष्ट

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.