जाणून घ्या राकेश झुनझुनवालांनी पोर्टफोलिओमधील कोणते पाच समभाग विकले?

यामध्ये Mandhana Retail Ventures, Lupin, Aptech, Fortis Healthcare आणि MCX या समभागांचा समावेश आहे. राकेश झुनझुनवाला यांनी Mandhana Retail चे 5.4 टक्के समभाग विकले आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे Mandhana Retail ची 12.7 टक्के इतकी हिस्सेदारी होती. आता त्यांचा हिस्सा केवळ 7.4 टक्के इतका राहिला आहे.

जाणून घ्या राकेश झुनझुनवालांनी पोर्टफोलिओमधील कोणते पाच समभाग विकले?
राकेश झुनझुनवाला


नवी दिल्ली: शेअर बाजारात बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्या प्रत्येक कृतीवर गुंतवणूकदारांचे लक्ष असते. राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधून 5 कंपन्यांचे शेअर्स कमी केले आहेत. त्यापैकी 2 कंपन्या अशा आहेत, ज्यात त्यांचा हिस्सा आता 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

यामध्ये Mandhana Retail Ventures, Lupin, Aptech, Fortis Healthcare आणि MCX या समभागांचा समावेश आहे. राकेश झुनझुनवाला यांनी Mandhana Retail चे 5.4 टक्के समभाग विकले आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे Mandhana Retail ची 12.7 टक्के इतकी हिस्सेदारी होती. आता त्यांचा हिस्सा केवळ 7.4 टक्के इतका राहिला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे Mandhana Retail कंपनीचे 1630900 समभाग आहेत. त्याची एकूण किंमत 2.5 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षभरात या समभागाने गुंतवणूकदारांना 84 टक्के इतका परतावा दिला आहे.

एमसीएक्स

राकेश झुनझुनवाला यांनी MCX मधील आपला हिस्सा 1 टक्क्यापेक्षा कमी केला आहे. जून तिमाहीत या कंपनीत त्यांचा 4.9 टक्के हिस्सा होता. MCX कंपनीच्या समभागांनी गेल्या 1 वर्षात 13% परतावा दिला आहे.

Aptech Ltd.

राकेश झुनझुनवाला यांनी Aptech Ltd मधील आपला हिस्सा 0.02 टक्क्यांनी कमी केला आहे. आता त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीच्या शेअर्सची संख्या 9,668,840 आहे. सध्याच्या किंमतीनुसार या शेअर्सचे एकूण मूल्य 295.5 कोटी रुपये आहे. कंपनीतील त्यांची भागीदारी सुमारे 23.7 टक्के आहे. अॅप्टेक लि. गेल्या वर्षभरात 158 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या समभागाची किंमत 117 रुपयांवरून 304 रुपयांपर्यंत वधारली होती.

Fortis Healthcare

राकेश झुनझुनवाला यांनीही सप्टेंबर तिमाहीत फोर्टिस हेल्थकेअरमधील त्यांचा हिस्सा सुमारे 0.1 टक्क्यांनी कमी केला आहे. त्यानुसार, आता कंपनीतील त्याचा हिस्सा 4.3 टक्क्यांवरून 4.2 टक्क्यांवर आला आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे 31,950,000 शेअर्स आहेत, ज्याचे मूल्य 842 कोटी रुपये आहे. फोर्टिस हेल्थकेअरने गेल्या वर्षभरात 107% परतावा दिला आहे. या काळात शेअरची किंमत 127 रुपयांनी वाढून 263 रुपये झाली.

Lupin Ltd.

राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत फार्मा कंपनी ल्यूपिनमधील आपला हिस्सा 1 टक्क्यांपेक्षा कमी केला आहे. जून तिमाहीत कंपनीत त्यांचा 1.6 टक्के हिस्सा होता. ल्युपिनने वर्षभरात 8 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

संबंधित बातम्या:

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक

फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही

ओलाच्या ई-स्कूटरसाठी कर्ज सहज उपलब्ध होणार, ईएमआय 2999 पासून सुरू, कंपनीने देशातील सर्व बँकांशी केला करार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI