AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI repo rate hike : रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमचा ‘ईएमआय’ नक्की किती वाढणार?

आरबीआयने आज पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयकडून रेपो रेट 50 बेसिस पॉईंटने वाढवण्यात आला आहे. रेपो रेट वाढवण्यात आल्याने तुमचा ईएमआय नक्की किती रुपयांनी वाढणार हे जाणून घेऊयात

RBI repo rate hike : रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमचा 'ईएमआय' नक्की किती वाढणार?
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 08, 2022 | 12:01 PM
Share

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने (RBI) आज पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयकडून रेपो रेट (Repo rate) 50 बेसिस पॉईंटने वाढवण्यात आला आहे. रेपो रेट 50 बेसिस पॉईंटने वाढवण्यात आल्यामुळे आता रेपो रेट 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयकडून चालू वर्षात दोनदा रेपो रेट वाढवण्यात आले आहेत. यापूर्वी चार मे रोजी झालेल्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये रेपो रेट 40 बेसिस पॉईंटने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा रेपो रेट 4 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांवर पोहोचला. आता पुन्हा एकदा त्यामध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आल्याने रेपो रेट 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास विविध प्रकारचे कर्ज महागते, तसेच तुम्ही पूर्वी घेतलेल्या कर्जाचा ईएमआय देखील वाढतो. चला तर जाणून घेऊयात नव्या रेपो रेट वाढीची झळ कितपत कर्जदारांना बसू शकते. तसेच ईएमआयमध्ये (EMI) नक्की किती वाढ होणार आहे.

‘ईएमआय’मध्ये किती वाढ?

आरबीआयने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्याने आता जवळपास सर्वच कर्ज महाग होणार आहेत. तसेच तुम्ही पूर्वी घेतलेल्या कर्जाचा ईएमआय देखील महागणार आहे. नव्या रेपो रेट वाढीनुसार समजा तुमच्याकडे एखाद्या बँकेचे 30 लाखांचे होम लोन वार्षिक सात टक्के व्याज दराने वीस वर्षांच्या कालावधीसाठी असेल तर तुम्हाला आता प्रत्येक एक लाखांच्या पाठीमागे 55 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. तुमचा ईएमआय पूर्वी जर 23259 रुपये असेल तर तुम्हाला आता 24907 रुपये भरावे लागणार आहेत. तुमच्या ईएमआयमध्ये एकूण 1648 रुपयांची वाढ होणार आहे.

रेपो रेटमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता

दरम्यान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदानुसार चालू वर्षात वर्षभर रेपो रेटमध्ये वाढ सूरूच राहण्याचा अंदाज आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ केली जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या मार्च अखेर आरबीआय रेपो रेट कोरोना पूर्व पातळीपर्यंत वाढू शकते. बाजारातील अतिरिक्त चलन कमी करून महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा उद्देश या रेपो रेट वाढीमागे आहे. मात्र काही तज्ज्ञांच्या मते रेपो रेट वाढून महागाई कमी होण्याची शक्यता कमीच आहे. कारण सध्या देशात वाढत असलेली ही महागाई अतिरिक्त चलन पुरवठ्यामुळे नाही तर वस्तुंच्या तुटवड्यामुळे निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.