AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; अ‍ॅक्सिस बँकेला ठोठावला 25 लाखांचा दंड

RBI Bank | रिझर्व्ह बँकेने 2016 मध्ये केवायसीसंबंधीच्या निर्देशांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती. अ‍ॅक्सिस बँकेच्या फेब्रुवारी 2020 ते मार्च 2020 या काळातील ग्राहकांच्या नोंदीत अनियमितता आढळून आली आहे.

रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; अ‍ॅक्सिस बँकेला ठोठावला 25 लाखांचा दंड
अ‍ॅक्सिस बँक
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 6:40 AM
Share

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावला आहे. अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank) केवायसीसंबंधीच्या नियमांची पूर्तता न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केल्याचे समजते. रिझर्व्ह बँकेने 2016 मध्ये केवायसीसंबंधीच्या निर्देशांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती. अ‍ॅक्सिस बँकेच्या फेब्रुवारी 2020 ते मार्च 2020 या काळातील ग्राहकांच्या नोंदीत अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे अ‍ॅक्सिस बँकेने KYCच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. परिणामी रिझर्व्ह बँकेकडून अ‍ॅक्सिसवर बडगा उभारण्यात आला.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक नियम कठोर केल्याने अनेक बँकांना दंड ठोठावल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच RBI ने हिमालच प्रदेशातील भगत शहरी सहकारी बँकेवरही (Bhagat Urban Co-Operative Bank) अशाचप्रकारची कारवाई केली होती. या बँकेने अनुत्पादित मालमत्तेसंबंधीच्या (NPA) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RBI ने बँकेला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, दिल्ली नागरिक बँकेलाही रिझर्व्ह बँकेकडून दणका देण्यात आला आहे. या बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

सारस्वत आणि एसव्हीसी सहकारी बँकेवर कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक (Saraswat Co-operative Bank Ltd) आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा (SVC Bank) समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांवर कारवाई

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने राज्यातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ((Indapur Urban Cooperative Bank) 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला (The Baramati Sahakari Bank Limited) एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.

संंबंधित बातम्या:

रिझर्व्ह बँकेकडे नाण्यांचा ढीग, ग्राहकांना नाणी द्या आणि इंन्सेन्स्टिव मिळवा, बँकांना खास ऑफर

मुंबई आणि बारामतीच्या ‘या’ सहकारी बँकेत तुमचे पैसे आहेत का? रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

आरबीआय नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, काय आहे विशेष? कोणत्या बॅंकांवर परिणाम होईल?

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.