मास्टरकार्डवरील बंदीनंतर RBL बँक जारी करणार व्हिसा क्रेडिट कार्ड, फायदे काय?

आरबीएल बँकने व्हिसा प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड जारी करणार आहे. हे कार्ड जारी करण्यासाठी व्हिसा वर्ल्ड वाईडकार्डसोबत एक सामंजस्य करार केला आहे.

मास्टरकार्डवरील बंदीनंतर RBL बँक जारी करणार व्हिसा क्रेडिट कार्ड, फायदे काय?
rbl-bank
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Jul 15, 2021 | 12:37 PM

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) बँकांकडून जारी करण्यात येणाऱ्या यूएस बेस्ड मास्टरकार्ड विरोधात मोठी कारवाई केली आहे. डेटा स्टोरेजच्या निकषांचे पालन न केल्याने यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याअंतर्गत नवीन क्रेडिट, डेबिट आणि प्रीपेड कार्ड देणे 22 जुलैपासून थांबविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आरबीएल बँकने व्हिसा प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड जारी करणार आहे. हे कार्ड जारी करण्यासाठी व्हिसा वर्ल्ड वाईडकार्डसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार लवकरच आरबीएल बँक व्हिसा क्रेडीट कार्ड जारी करणार आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी आठ ते दहा आठवड्यांचा कालावधी लागेल. तसेच व्हिसा कार्डच्या मदतीने तुम्ही परदेशात पैसे पाठविण्यापासून ते बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे, दुकानात पैसे भरणे आणि ऑनलाईन शॉपिंग इत्यादी गोष्टी सहज करु शकता.

RBI ची मास्टरकार्डवर मोठी कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI ) आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयात आरबीआयच्या निर्देशांचं पालन न केल्याचं सांगत मास्टरकार्डवर कारवाई करण्यात आलीय. पुरेशी मुदत देऊनही संस्थांना पेमेंट सिस्टम डेटा संग्रहित करण्याच्या सूचनांचे पालन न केल्याचे आढळलेय. कारवाईचा एक भाग म्हणून आरबीआयने मास्टरकार्ड एशिया/पॅसिफिक पीटीईवर बंदी आणली आहे, असंही केंद्रीय बँकेने सांगितलंय. 22 जुलै 2021 पासून त्याच्या कार्ड नेटवर्कवर नवीन स्थानिक ग्राहक (डेबिट, क्रेडिट किंवा प्रीपेड) जोडू शकणार नाहीत.

आरबीआयने म्हटले आहे की, या आदेशाचा मास्टरकार्डच्या विद्यमान ग्राहकांवर परिणाम होणार नाही. मास्टरकार्ड सर्व कार्ड जारी करणार्‍या बँकांना आणि बिगर बॅंकांना या सूचनांचे अनुसरण करण्यास सल्ला देईल. आरबीआयने सांगितले की, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अ‍ॅक्ट, 2007(पीएसएस अॅक्ट)च्या कलम 17 अंतर्गत आरबीआयकडे निहित अधिकारांचा उपयोग करून ही कारवाई केली गेलीय.

मास्टरकार्ड एक पेमेंट सिस्टम ऑपरेटर

मास्टरकार्ड एक पेमेंट सिस्टम ऑपरेटर आहे, जो देशातील कार्ड नेटवर्क ऑपरेट करण्यासाठी अधिकृत आहे. 6 एप्रिल 2018 रोजीच्या पेमेंट सिस्टम डेटाच्या संग्रहाच्या आरबीआयच्या परिपत्रकानुसार सर्व सिस्टम प्रदात्यांना हे सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांनी चालवलेल्या रक्कम प्रणालीशी संबंधित संपूर्ण दिवस फक्त सहा महिन्यांच्या कालावधीत भारतातील एकच व्यवहार असेल. सिस्टीममध्ये हे सर्व संग्रहित आहे.

(RBL Bank to issue Visa credit cards after RBI bans Mastercard)

संबंधित बातम्या :

UIDAI अलर्ट! तुमचा आधार बनावट की खरा? ऑनलाईन आणि ऑफलाईन असा तपासा

PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट

HDFC नंतर आता मास्टरकार्डवर मोठी कारवाई, RBI ची नवे ग्राहक जोडण्यावर बंदी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें