रिअल इस्टेटला सुगीचे दिवस! स्टॅम्प ड्युटी सवलतींमुळे मालमत्तांचे रजिस्ट्रेशन दुप्पटीने वाढले

नाईट फ्रँकच्या आकडेवारीनुसार, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घरांच्या नोंदणीमध्ये अनुक्रमे 39, 268 आणि 80 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये 7,316 युनिट्सची नोंदणी करण्यात आली, जी या वर्षातील एकाच महिन्यातील सर्वाधिक विक्री आहे

रिअल इस्टेटला सुगीचे दिवस! स्टॅम्प ड्युटी सवलतींमुळे मालमत्तांचे रजिस्ट्रेशन दुप्पटीने वाढले
रिअल इस्टेटला सुगीचे दिवस! स्टॅम्प ड्युटी सवलतींमुळे मालमत्तांचे रजिस्ट्रेशन दुप्पटीने वाढले

नवी दिल्ली : कोरोना महामारीत ठप्प झालेल्या रिअल इस्टेटला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. देशातील काही राज्यांमध्ये मालमत्तांचे रजिस्ट्रेशन दुप्पटीने वाढले आहे. यात कोलकातासह कर्नाटक राज्याचा समावेश आहे. राज्यांनी स्टॅम्प ड्युटीमध्ये केलेली कपात यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात कोरोना महामारीपूर्वीचे चांगले वातावरण संचारले आहे. कोलकातामध्ये जुलै-सप्टेंबरदरम्यान निवासी नोंदणी दुप्पटपेक्षा अधिक नोंद झाली. या तिमाहीत संपूर्ण कोलकाता महानगरामध्ये 15,160 युनिट्सचे रजिस्ट्रेशन झाले. तेथील राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. मालमत्ता सल्लागार कंपनी नाइट फ्रँकने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. नाईट फ्रँकने सांगितले की, कोलकाता महानगर प्रदेशात जुलै-सप्टेंबर 2021 दरम्यान एकूण 15,160 निवासी विक्रीची नोंदणी झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील नोंदणीपेक्षा 122 टक्क्यांनी जास्त आहे. (Registration of properties doubled due to stamp duty concessions)

ऑगस्टमध्ये 7316 घरांची नोंदणी

नाईट फ्रँकच्या आकडेवारीनुसार, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घरांच्या नोंदणीमध्ये अनुक्रमे 39, 268 आणि 80 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये 7,316 युनिट्सची नोंदणी करण्यात आली, जी या वर्षातील एकाच महिन्यातील सर्वाधिक विक्री आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पश्चिम बंगाल सरकारने जुलै महिन्यात राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व कागदपत्रांवर मुद्रांक शुल्कात दोन टक्के कपात करण्याची घोषणा केली होती.

मुद्रांक शुल्कात कपात केल्याने सर्कल रेटमध्ये घट

नाईट फ्रॅंक कंपनीने म्हटले आहे की मुद्रांक शुल्काच्या सूटचा लाभ त्या कागदपत्रांसाठी उपलब्ध आहे, ज्या मालमत्तांची नोंदणी 9 जुलै 2021 ते 30 ऑक्टोबर 2021 दरम्यान पूर्ण झालेली असेल. स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासह सर्कल रेटमध्ये 10 टक्के कपात केल्याने घर खरेदीदारांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे.

कर्नाटक सरकारनेही केली मुद्रांक शुल्कात कपात

कर्नाटक सरकारने गेल्या महिन्यात मुद्रांक शुल्कात 2 टक्के कपात केली होती. कर्नाटकात 45 लाख रुपयांच्या फ्लॅटवर 2% मुद्रांक शुल्क कमी केले. आता 5% ऐवजी 3% मुद्रांक शुल्क झाले असून 45 लाख रुपयांपर्यंतच्या फ्लॅटच्या खरेदीवर हे भरावे लागेल. अशाप्रकारे सरकारने 2 टक्के मुद्रांक शुल्क कमी केले आहे. नियमांनुसार ही सूट पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना उपलब्ध असेल. कोरोना महामारीच्या काळात रिअल इस्टेटच्या किंमती कमी झाल्या आहेत. घरांची विक्री कमी होत आहे. अशा परिस्थितीत मुद्रांक शुल्काची कपात केवळ घर खरेदी करणाऱ्यांनाच नव्हे तर राज्य सरकारांनाही मोठा दिलासा ठरू शकणार आहे. (Registration of properties doubled due to stamp duty concessions)

इतर बातम्या

‘या’ स्मॉल फायनान्स बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सर्वकाही

फक्त दोन रुपयांची बचत करा आणि मिळवा 36000 रुपये; केंद्र सरकारची खास योजना, जाणून घ्या सर्वकाही

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI