‘या’ स्मॉल फायनान्स बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सर्वकाही

Small Finance banks | देशातील प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांनी बचत खाते आणि मुदत ठेव योजनांवरील व्याजदर घटवला असला तरी स्मॉल फायनान्स बँक आणि काही बिगरबँकिंग वित्तसंस्थांकडून फिक्स्ड डिपॉझिटवर आकर्षक व्याज दिले जात आहे.

'या' स्मॉल फायनान्स बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सर्वकाही
स्मॉल फायनान्स बँक

मुंबई: दीर्घकालीन गुंतवणूक करताना प्रत्येकजण जास्त फायदा कसा मिळेल, याचा विचार करत असतो. कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्यामुळे बँकांनी मुदत ठेव योजनांवरील (Fixed Depopsit) व्याजदर कमी केला आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदार सुरक्षित आणि चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या पर्यायांच्या शोधात आहेत.

देशातील प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांनी बचत खाते आणि मुदत ठेव योजनांवरील व्याजदर घटवला असला तरी स्मॉल फायनान्स बँक आणि काही बिगरबँकिंग वित्तसंस्थांकडून फिक्स्ड डिपॉझिटवर आकर्षक व्याज दिले जात आहे. त्यामुळे या स्मॉल फायनान्स बँकांची पार्श्वभूमी व्यवस्थित तपासून त्यामध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

7 दिवस ते 45 दिवस कालावधी: 3.00 टक्के
46 दिवस ते 90 दिवसांचा कालावधी: 3.25 टक्के
कालावधी 91 दिवस ते 180 दिवस: 4.00 टक्के
181 दिवसांपासून 364 दिवसांचा कालावधी: 5.75 टक्के
365 दिवस ते 699 दिवसांचा कालावधी: 6.25 टक्के
700 दिवसांचा कालावधी: 6.75 टक्के
कालावधी 701 दिवस ते 3652 दिवस: 6.00 टक्के

( हे दर 1 जुलै 2021 पासून लागू झाले आहेत.)

जन स्मॉल फायनान्स बँक

7 दिवस ते 14 दिवसांचा कालावधी: 2.50 टक्के
15 दिवस ते 60 दिवस कालावधी: 3.00 टक्के
61 दिवस ते 90 दिवसांचा कालावधी: 3.75 टक्के
91 दिवस ते 180 दिवसांचा कालावधी: 4.50 टक्के
181 दिवसांपासून 364 दिवसांचा कालावधी: 5.50 टक्के
1 वर्षाचा कालावधी: 6.25 टक्के
181 दिवसांपासून 364 दिवसांचा कालावधी: 5.50 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षे कालावधी: 6.50 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षे कालावधी: 6.50 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षे कालावधी: 6.75 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे कालावधी: 6.00 टक्के

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

7 दिवस ते 45 दिवस कालावधी: 3.00 टक्के
46 दिवस ते 90 दिवसांचा कालावधी: 3.25 टक्के
91 दिवस ते 180 दिवसांचा कालावधी: 3.50 टक्के
181 दिवसांपासून 364 दिवसांचा कालावधी: 5.00 टक्के
12 महिने ते 15 महिन्यांचा कालावधी: 5.60 टक्के
15 महिने 1 दिवस ते 18 महिने कालावधी: 5.60 टक्के
18 महिने 1 दिवस ते 21 महिन्यांचा कालावधी: 6%
21 महिने 1 दिवस ते 24 महिन्यांचा कालावधी: 6%
24 महिने 1 दिवस ते 30 महिन्यांचा कालावधी: 6.25 टक्के

(हा व्याजदर 29 जुलै 2021 पासून लागू झाला आहे.)

इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक

7 दिवस ते 14 दिवसांचा कालावधी: 3.50 टक्के
15 दिवस ते 29 दिवसांचा कालावधी: 3.50 टक्के
30 दिवस ते 45 दिवसांचा कालावधी: 3.50 टक्के
कालावधी 46 दिवस ते 62 दिवस: 4.0 टक्के
91 दिवस ते 120 दिवस कालावधी: 4.35 टक्के

( हे व्याजदर 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू झाले आहेत.)

संबंधित बातम्या:

या तीन बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज

FD वर 5 वर्षांत 65 हजारांची कमाई, आपल्या ग्राहकांना ‘या’ बँकेची खास ऑफर

तुम्हाला SBI आणि HDFC Bank पेक्षा जास्त परतावा हवाय, ‘या’ बँकांमध्ये एफडी करा, 7 टक्के व्याज फिक्स्ड

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI