AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच रुपयांच्या समभागाची किंमत झाली 42 रुपये, सहा महिन्यांत 700 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदार मालामाल

Share Market | 2021-22 मध्ये स्टॉक आतापर्यंत 700 टक्क्यांहून वाढला आहे. 31 मार्च 2021 रोजी या समभागाची किंमत अवघी पाच रुपये होती. आता याच समभागाची किंमत 42.8 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत हा समभाग 739 टक्क्यांनी वाढला आहे.

पाच रुपयांच्या समभागाची किंमत झाली 42 रुपये, सहा महिन्यांत 700 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदार मालामाल
शेअर मार्केट
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 23, 2021 | 11:20 AM
Share

नवी दिल्ली: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात Rattanindia Enterprises कंपनीच्या समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या सहा महिन्यांत Rattanindia Enterprises च्या शेअर्सनी गुंतवणूकादारांना नऊपट परतावा दिला आहे. या काळात कंपनीने गुंतवणूकदारांना सहा महिन्यांत 700 टक्के फायदा करुन दिला आहे.

2021-22 मध्ये स्टॉक आतापर्यंत 700 टक्क्यांहून वाढला आहे. 31 मार्च 2021 रोजी या समभागाची किंमत अवघी पाच रुपये होती. आता याच समभागाची किंमत 42.8 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत हा समभाग 739 टक्क्यांनी वाढला आहे.

कंपनीचा व्यवसाय काय?

Rattanindia Enterprises कंपनीचा पसारा औष्णिक उर्जा, रिन्यूएबल एनर्जी, ग्राहक वित्तपुरवठा अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरला आहे. या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत Rattanindia ची भांडवली बाजारातील कामगिरी खूपच उजवी आहे.

कंपनीत गुंतवणूक करावी का?

गुंतवणूकदारांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्यावी. कंपनीची आर्थिक कामगिरी त्याच्या भांडवली बाजारातील कामगिरीशी जुळत नाही. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जूनमध्ये कंपनीची विक्री केवळ 1 कोटी रुपये झाली आहे. यामुळे कंपनीला 83 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर 2018 ते डिसेंबर 2020 या तिमाहीत कंपनीची विक्री शून्य झाली आहे. तरीही भांडवली बाजारात कंपनीच्या समभागाचा भाव वाढत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली होती.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला होता.

संबंधित बातम्या:

अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

अवघ्या 1.55 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 301.60 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

अवघ्या सात रुपयांत मिळणाऱ्या शेअरची किंमत झाली 718 रुपये, एका लाखाचे झाले 1 कोटी

Follow Us
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?