AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 5 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 233 रुपये; एका लाखाच्या गुंतवणुकीवर 42.30 लाख रुपयांची कमाई

Share Market | मध्यंतरी या समभागाची किंमत 300 रुपयांवर जाऊन पोहोचली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात या समभागाची किंमत 120 रुपयांपर्यंत घसरली होती. गीता रिन्यूएबल एनर्जी ही उर्जा क्षेत्रातील कंपनी आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीची वाटचाल चांगली असेल, असा जाणकारांचा कयास आहे.

अवघ्या 5 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 233 रुपये; एका लाखाच्या गुंतवणुकीवर 42.30 लाख रुपयांची कमाई
शेअर मार्केट
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 11:03 AM
Share

मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. आगामी काही महिन्यांमध्ये मुंबई बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असे भाकीत वर्तविले जात आहे. अशावेळी आतापासूनच गुंतवणूक करुन चांगला फायदा पदरात पाडून घेण्याची संधी आहे.

सध्या शेअर बाजारात गीता रिन्यूएबल एनर्जी (Gita Renewable Energy) या समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात Gita Renewable Energy कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 4130 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी 13 ऑक्टोबर 2020 रोजी या समभागाची किंमत 5.52 रुपये इतकी होती. 14 ऑक्टोबर 2021 रोजी याच समभागाची किंमत 233.50 रुपये नोंदवण्यात आली. तुम्ही सहा महिन्यांपूर्वी Gita Renewable Energy चे एक लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य साधारण 7.95 लाख रुपये इतके झाले आहे.

मध्यंतरी या समभागाची किंमत 300 रुपयांवर जाऊन पोहोचली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात या समभागाची किंमत 120 रुपयांपर्यंत घसरली होती. गीता रिन्यूएबल एनर्जी ही उर्जा क्षेत्रातील कंपनी आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीची वाटचाल चांगली असेल, असा जाणकारांचा कयास आहे.

गुंतवणूक करावी का?

गेल्या महिनाभरात Gita Renewable Energy च्या समभागाची किंमत जवळपास निम्म्याने घसरली आहे. ही किंमत इतक्या झपाट्याने घसरत होती की अनेकदा या समभागासाठी लोवर सर्किट लागले. त्यामुळे महिनाभरापूर्वी या कंपनीचे समभाग खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. सध्या समभागाची किंमत सार्वकालिक उच्चांकापेक्षा बरीच खाली असली तरी यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले होते. मध्यंतरी या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे. एका सत्रात गुडलक इंडियाच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, 10 टक्क्यांवर अप्पर सर्किट लागले होते. गेल्या पाच सत्रांमध्ये या समभागाची किंमत तब्बल 31 टक्क्यांनी वाढली होती.

संबंधित बातम्या:

अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

अवघ्या 1.55 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 301.60 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

अवघ्या सात रुपयांत मिळणाऱ्या शेअरची किंमत झाली 718 रुपये, एका लाखाचे झाले 1 कोटी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.