Sukanya Samriddhi Scheme | दरमहा 12,500 रुपयांची बचत, तुमची राजकन्या उच्च शिक्षणात घेईल भरारी, गाठीशी असेल 64 लाखांची शिदोरी

Sukanya Samriddhi Scheme | सुकन्या समृद्धी योजना तुमच्या राजकन्येला भविष्यात परदेशात शिक्षणासाठी मदत करु शकते. तुम्हाला बँकेकडे कर्ज मागण्याची गरज उरणार नाही.

Sukanya Samriddhi Scheme | दरमहा 12,500 रुपयांची बचत, तुमची राजकन्या उच्च शिक्षणात घेईल भरारी, गाठीशी असेल 64 लाखांची शिदोरी
राजकन्येचे स्वप्न करा साकारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 7:31 AM

Sukanya Samriddhi Scheme | दरमहा 12,500 रुपयांची बचत (Saving Scheme) तुमच्या राजकन्येला परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळवून देऊ शकते. तिला वयाच्या 21 व्या वर्षी 64 लाखांची एकरक्कमी मदत तुम्ही देऊ शकता. तर ही योजना तुमच्या ओळखीच म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) आहे. ही योजना केंद्र सरकार (Central Government) चालवते, त्यामुळे जमा केलेले भांडवल बुडण्याची भीती अजिबात नाही. मुलींच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च या योजनेतून भागविता येतो. या योजनेतंर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडले जाते. म्हणायला ही एक छोटी बचत योजना आहे, पण त्याचा परतावा कोणत्याही अर्थाने कमी नाही. तुम्ही कोणत्याही अधिकृत बँक (Bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता. योजनेत जमा केलेले पैसे किंवा मॅच्युरिटी रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही, हा ही एक बोनस फायदा तुम्हाला मिळतो.

व्याजदर चांगला

सुकन्या समृद्धी खात्यात एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. तसेच, प्राप्तिकर कायद्यानुसार, तुम्ही या खात्यात जमा केलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेत सरकार 7.6% व्याज देते. महागाई दराच्या दृष्टीने हे व्याज सरासरी महागाई दरापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे या महागाईच्या काळातही चांगला परतावा मिळवायचा असेल, तर मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडणे हा एक अतिशय योग्य पर्याय असू शकतो.

सुकन्या समृद्धी खात्याचा लॉक इन कालावधी 21 वर्षांचा आहे आणि या कालावधीत खात्यातून पैसे काढता येत नाही. जर तुम्ही मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी खाते उघडले आणि दरमहा 12,500 रुपये जमा केल्यास तुमच्या राजकन्येच्या नावावर 21 वर्षांनंतर, 64 लाख रुपये सहज जमा होतील. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी ही रक्कम पुरेशी आहे. जर एखाद्या व्यक्तीने 1 वर्षाच्या वयात आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडले तर पुढील 14 वर्षे किंवा मुलीच्या वयाच्या 15 वर्षांपर्यंत खात्यात गुंतवणूक केली जाईल. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर खाते मॅच्युअर होईल आणि तिला ही भलीमोठी रक्कम मिळेल.

हे सुद्धा वाचा

सुकन्या समृद्धी योजनेत 7.4% व्याज सध्या मिळत आहे. नियमीत दरमहा केलेली गुंतवणूक तुम्हच्या मुलीला 64 लाख रुपये मिळवून देतील. मुलीच्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम वयाच्या 18 व्या वर्षी काढता येते. नियमानुसार, मुलगी सज्ञान झाल्यावर ही रक्कम काढता येते. जर वयाच्या 18 व्या वर्षी रक्कम काढली नाही तर वयाच्या 21 वर्षी तर खात्यात 64 लाख रुपये आरामात जमा होतील.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.