मोठी बातमी | सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी टाटाने लावली बोली

सूत्रांच्या माहितीनुसार एअर इंडियावर एकूण 43 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि हे संपूर्ण कर्ज सरकारी हमीवर आहे. जर टाटाने बोली जिंकली तर त्यांना एअर इंडियामध्ये मालकी हक्क मिळतील.

मोठी बातमी | सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी टाटाने लावली बोली
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी टाटाने लावली बोली
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 9:17 PM

नवी दिल्ली : प्रचंड कर्जाखाली दबलेली एअर इंडिया(Air India) ही सरकारी मालकीची विमान कंपनी विकण्याची प्रक्रिया सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टाटाने एअर इंडियासाठी बोली लावली आहे. विमानन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले होते की 15 सप्टेंबरची शेवटची तारीख बदलली जाणार नाही. सरकार पूर्वी 2018 मध्ये एअर इंडियातील 76 टक्के हिस्सा विकण्याची तयारी करत होते, पण त्यावेळी त्यासाठी कोणताही खरेदीदार सापडला नाही आणि मग तो पूर्णपणे विकण्याची कसरत सुरू झाली. एअर इंडियावर एकूण 43 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी 22 हजार कोटी रुपये एअर इंडिया अॅसेट होल्डिंग लिमिटेडला हस्तांतरित केले जातील. (Tata bids to buy state-owned airline Air India)

टाटाने लावली एअर इंडियासाठी बोली

सूत्रांच्या माहितीनुसार एअर इंडियावर एकूण 43 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि हे संपूर्ण कर्ज सरकारी हमीवर आहे. जर टाटाने बोली जिंकली तर त्यांना एअर इंडियामध्ये मालकी हक्क मिळतील. विमान कंपनीची मालकी नवीन कंपनीला देण्यापूर्वी हे कर्ज सरकार उचलणार आहे.

एअर इंडियाबाबत सरकारची काय योजना आहे?

केंद्र सरकार एअर इंडिया आणि त्याची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसमधील शंभर टक्के हिस्सा विकण्याच्या योजनेवर काम करत आहे. यासोबतच ग्राउंड हँडलिंग कंपनी एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 50 टक्के निर्गुंतवणुकीची योजना आहे. मुंबईतील एअर इंडिया इमारत आणि दिल्लीतील एअरलाइन्स हाऊस विकण्याची योजना आहे.

विकले नाही तर एअर इंडिया बंद होईल!

सरकारने संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, जर एअर इंडियाचे खाजगीकरण केले नाही तर ते बंद करावे लागेल. त्याच्या ऑपरेशनसाठी निधी कुठून येणार? सध्या एअर इंडिया ही प्रथम श्रेणीची मालमत्ता आहे. अशा परिस्थितीत खरेदीदारांना ते सहज मिळेल. दुसरीकडे, एअर इंडियाची कर्मचारी संघटना कंपनीच्या निर्गुंतवणुकीच्या प्रस्तावाला विरोध करत आहे. कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती आहे.

टाटाचे एअर इंडियाशी काय संबंध आहे?

एअर इंडियाची स्थापना उद्योगपती जेआरडी टाटा यांनी केली. पण त्यावेळी त्याचे नाव एअर इंडिया नव्हते. तेव्हा त्याचे नाव टाटा एअरलाइन्स होते. टाटा एअरलाईन्सची सुरुवात 1932 साली झाली होती, परंतु जेआरडी टाटा यांनी पहिले विमान 1919 मध्ये उडवले जेव्हा ते फक्त 15 वर्षांचे होते.

मग त्यांनी पायलटचा परवाना मिळवला. पण त्यांनी पहिले व्यावसायिक उड्डाण 15 ऑक्टोबर रोजी केले, जेव्हा त्याने कराचीहून अहमदाबाद मार्गे मुंबईला एक इंजिन असलेले ‘हॅव्हीलंड पुस मोथ’ विमान घेतले.

सुरुवातीला, टाटा एअरलाइन्स मुंबईच्या जुहूजवळील एका मातीच्या घरातून संचालित होत असे. तेथे असलेले मैदान ‘रनवे’ म्हणून वापरले जात असे. पाऊस पडला की हे मैदान पाण्याने भरलेले असायचे. त्यावेळी ‘टाटा एअरलाइन्स’कडे दोन लहान सिंगल इंजिन विमाने, दोन पायलट आणि तीन मेकॅनिक्स असायचे. पाणी भरल्यानंतर जेआरडी टाटा पुण्यातून आपली विमाने संचालित करत असत.

1933 हे टाटा एअरलाइन्सचे पहिले व्यावसायिक वर्ष होते. दोन लाखांच्या खर्चावर स्थापन झालेल्या टाटा सन्स या कंपनीने त्याचवर्षी 155 प्रवासी आणि सुमारे 11 टन डाक उडवले. एका वर्षात, टाटा एअरलाईन्सच्या विमानांनी एकूण 160,000 मैल उड्डाण केले. (Tata bids to buy state-owned airline Air India)

इतर बातम्या

नव्या तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये होणार अमुलाग्र बदल, पेरणीपासून बाजारपेठ पर्यंत माहिती होणार उपलब्ध

राजकीय अस्मितेचा धंदा बंद करा; परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून शेलार शिवसेनेवर गरजले?

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.