Bank Loan : पैशांची जाणवतेय चणचण, मग पर्सनल लोन घेता कशाला? हे पर्याय असताना

Bank Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी या पर्यायांचा एकदा विचार करा.

Bank Loan : पैशांची जाणवतेय चणचण, मग पर्सनल लोन घेता कशाला? हे पर्याय असताना
वैयक्तिक कर्जाऐवजी हे पर्याय
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 7:21 PM

नवी दिल्ली : प्रत्येकाला कधी ना कधी अचानक रक्कमेची आवश्यकता पडेतच. प्रत्येकाला पैशांची चणचण (Need of Money) जाणवतेच. अशावेळी नातेवाईक, मित्रांकडे आपण उसनवारी करतो. पण अगोदरच उधारी असेल तर आपण थेट वैयक्तिक कर्जाचा (Personal Loan) पर्याय निवडतो. पण त्यासाठी अर्थातच बँका (Bank) कागदपत्रे आणि इतर प्रक्रिया पार पाडण्यात वेळ दडवतात. त्यामुळे अनेकदा गरजेच्यावेळी हा पर्यायही कुचकामी ठरतो. अशावेळी वैयक्तिक कर्जापेक्षा दुसरे कोणते पर्याय उपयोगी ठरु शकतात, ते पाहुयात.

जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड (Credit Card) असेल तर कार्डनुसार तुम्हाला प्री अप्रुड कर्ज मिळते. अथवा क्रेडिट कार्डवरील ऑफर नुसार आगाऊ रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. पण या कर्जावर व्याजही जादा मोजावे लागते. वैयक्तिक कर्जासारखेच व्याजदर असतात. त्यामुळे वैयक्तिक कर्जापेक्षा दुसरे पर्याय निवडणे आवश्यक आहे.

बँकेच्या खात्यात तुम्ही ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळवू शकता. ओव्हरड्राफ्ट हा पण कर्जाचाच एक प्रकार आहे. बँका करंट अकाऊंट, सॅलरी अकाऊंट आणि फिक्स डिपॉजिटवर ओव्हरड्राफ्टची सुविधा देतात. तुम्ही खात्यातील शिल्लकीपेक्षा, बॅलन्सपेक्षा अधिकची रक्कम मिळवू शकता. या योजनेत ठराविक काळासाठी व्याज द्यावे लागते.

हे सुद्धा वाचा

क्रेडिट कार्डधारकांना प्री अप्रुव्हड क्रेडिट लिमिट देण्यात येते. तसेच Line of Credit अंतर्गत कर्ज मिळते. क्रेडिट स्कोअरच्या आधारे Line of Credit अंतर्गत कर्जाची सुविधा मिळते. या योजनेत तुम्ही जेवढा खर्च कराल, तेवढ्याच रक्कमेवर तुम्हाला व्याज द्यावे लागते. वैयक्तिक जेवढे कर्ज घेतले, तेवढ्याच रक्कमेवर तुम्हाला व्याज द्यावे लागते.

तुम्हाला बचतीची सवय असेल तर गरजेच्यावेळी ती उपयोगी पडते. तुम्ही बँकेत मुदत ठेव केली असेल तर या एफडीवर बँक तुम्हाला कर्ज देते. तुम्हाला एफडीवर 90 ते 95 टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा मिळते. मुदत ठेवीवर कर्ज देताना प्रक्रिया शुल्क लागत नाही. एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा कर्ज रक्कमेवरील व्याज 1 ते 2 टक्के जास्त असते.

पीपीएफ खात्यावरील बचतीवरही कर्जाची सुविधा मिळते. पण त्यासाठी या खात्याला एक वर्ष पूर्ण असण्याची अट आहे. पीपीएफ खात्यावर कर्ज घेतल्यास, तुम्हाला मिळणाऱ्या व्याजापेक्षा 1% जादा व्याज द्यावे लागते. पीपीएफ खात्यावर 7.10 टक्के व्याज मिळत असेल तर कर्जाच्या रक्कमेवर 8.10 टक्के व्याज द्यावे लागते. हे कर्ज तुम्हाला 36 हप्त्यात फेडता येते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.