AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Investment : फेस्टिव्ह ऑफर! बचत तर होणार पण कॅशबॅकही मिळणार

Investment : ग्राहकांसाठी या क्रेडिट कार्ड कंपनीने जबरदस्त फेस्टिव्ह ऑफर आणली आहे..

Investment : फेस्टिव्ह ऑफर! बचत तर होणार पण कॅशबॅकही मिळणार
CashbackImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 30, 2022 | 3:40 PM
Share

नवी दिल्ली : सध्या बाजारात सणाचा उत्साह (Festive Seasons) आहे. दसरा तोंडावर आलाय तर त्यापाठोपाठ दिवाळी येणार आहे. ग्राहकांसाठी आता विविध ऑफर (Offers) येत आहेत. काही ऑफर्स या फसव्या असतात. तर काही आवळा देऊन कोहळा काढणाऱ्या असतात. पण या ऑफरमधून तुमची बचत तर होईलच पण कॅशबॅकही (Cashback) मिळेल.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) क्रेडिट कार्ड विभागाने (SBICARD) सणाच्या तोंडावर ही खास ऑफर आणली आहे. SBI ने फेस्टिव्ह ऑफर 2022 (Festive Offer 2022) ची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना अनेक पद्धतीने फायदा होणार आहे. या ऑफरची सुरुवात झाली आहे.

एसबीआय क्रेडिट कार्डधारकाला या ऑफरचा फायदा उचलता येईल. येत्या 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत ही ऑफर सुरु राहणार आहे. विविध पार्टनर ब्रँड्सच्या मदतीने ग्राहकांना 22.5% टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देण्याचा दावा बँकेने केला आहे.

सणासुदीत एसबीआयने 10-15 नव्हे तर तब्बल 1600 ऑफर्सची लॉटरी आणली आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला याचा फायदा मिळणार आहे. ग्राहकांना टियर 1, टियर 2 आणि टियर 3 या शहरात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने या ऑफर्सचा लाभ घेता येईल.

त्यांना आवडीच्या आणि लोकप्रिय ग्राहक उपयोगी वस्तू खरेदी करताना आकर्षक ऑफर मिळतील. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फॅशन आणि लाईफस्टाईल, आभूषण, ट्रॅव्हल आणि ऑनलाईन मार्केटप्लेसची यांचा समावेश आहे.

एसबीआय क्रेडिट कार्ड ग्राहकांना फेस्टिव्ह ऑफर 2022 साठी 2600 शहरात 70 हून अधिक ऑफर मिळतील. तर या कार्डधारकांना 1550 स्थानिक ऑफर मिळतील. फेस्टिव्ह ऑफरनुसार ग्राहकाला विविध ब्रँड्सवर 22.5% टक्क्यांपर्यंत कॅशबॅकचा लाभ घेता येईल.

या ऑफर्ससोबत ग्राहकांना ईएमआयची सुविधाही देण्यात आली आहे. देशभरातील 1.6 लाख व्यापारी आणि 2.25 लाखांहून अधिक स्टोअर्सवर ईएमआयची सुविधा उपलब्ध आहे. तसेच ईएमआयवर 15% कॅशबॅकचीही सुविधा देण्यात आली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.