Elon Musk : ट्विटर वापरणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार, नवे मालक एलन मस्कची घोषणा, सामान्यांनाही पैसे द्यावे लागणार?

ट्विटर संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. भविष्यात ट्विटरच्या वापरासाठी पैसे मोजावे लागू शकतात. तसे संकते ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांच्याकडून देण्यात आले आहेत.

Elon Musk : ट्विटर वापरणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार, नवे मालक एलन मस्कची घोषणा, सामान्यांनाही पैसे द्यावे लागणार?
Image Credit source: twitter
अजय देशपांडे

|

May 04, 2022 | 8:42 AM

प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरची (Twitter) खरेदी केल्यापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क (Elon Musk) सतत्याने या ना त्या कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा एलन मस्क चर्चेमध्ये आले आहेत. त्याला कारण देखील तसेच खास आहे. भविष्यात ट्विटरचा फ्री वापर करता येणार नसल्याचे संकेत एलन मस्क यांच्याकडून देण्यात आले आहेत. म्हणजेच काही काळानंतर ट्विटरच्या वापरासाठी कदाचीत पैसे मोजावे लागू शकतात. ट्विटर पेड होणार आहे, असे संकेत एलन मस्क यांच्याकडून देण्यात आले आहेत. मात्र त्याचबरोबर त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, जे सामान्य युजर्स आहेत, त्यांच्यासाठी ट्विटरची सेवा फ्री असणार आहे. मात्र जे वापरकर्ते ट्विटरचा उपयोग व्यवसायिक (Commercial) कारणांसाठी करतील त्यांच्याकडून ट्विटर शुल्क आकारू शकते.

ट्विटर हे संवादाचे सशक्त माध्यम बनावे

एलन मस्क यांनी म्हटले आहे की, येत्या काळात अधिकाधिक वापरकर्ते ट्विटरला जोडने आणि त्यामाध्यमातून ट्विटरचा विस्तार करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. मला असे वाटते की अमेरिकेतील एक मोठा समुदाय हा ट्विटरला जोडला जावा. ट्विटर हे सोशल मीडियाचे असे प्लॅटफॉर्म बनावे की, ज्या माध्यमातून लोकांना आपल्या भावना मुक्तपणे मांडता याव्यात. ट्विटरच्या एका रिपोर्टनुसार सध्या स्थितीमध्ये अमेरिकेमधील तब्बल चार कोटी नागरिक ट्विटरचा वापर करतात. ही संख्या आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच ट्विटर हे युजर्स फ्रेंडली व्हावे यासाठी त्यामध्ये आणखी काही फीचर विकसीत केले जाऊ शकतात असे संकेत देखील एलन मस्क यांच्या वतीने देण्यात आले आहेत.

मस्क यांनी नेमके काय म्हटले?

मस्क यांनी याबाबत बोलताना म्हटले की, भविष्यात कदाचित ट्विटर आपल्या वापरकर्त्यांकडून सेवेच्या बदल्यात चार्ज आकारू शकते. मात्र जे सामान्या किंवा अव्यवसायिक कारणांसाठी ट्विटरचा वापर करतात त्यांच्यासाठी ट्विटर आपली सेवा कायमच फ्री ठेवणार आहे. मात्र जी संस्था किंवा व्यक्ती ट्विटरचा वापर हा व्यवसायिक कारणासाठी करणार असेल त्यांच्याकडून चार्ज म्हणून एक ठराविक रक्कम आकारली जाऊ शकते. यामध्ये विविध व्यवसायिक तसेच सरकारी संस्था यांचा समावेश करण्यात येईल. याबाबत लवकरच निर्णयाची घोषणा करण्यात येणार असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें