AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI Payment : PhonePe आणि Google Pay च्या एकाधिकारशाहीला धक्का, आले UPI चे नवीन फीचर

UPI Payment : फोनपे आणि गुगलपेची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी UPI चे नवीन फीचर दाखल होत आहे. त्यामुळे पेमेंट अडकण्याच्या झंझटीतून मुक्तता मिळेल. तसेच या फीचरमुळे इतर एपच्या दादागिरीला चाप बसेल. नवीन फीचरमुळे व्यवहार पण झटपट होईल. तांत्रिक अडचणी दूर होतील.

UPI Payment : PhonePe आणि Google Pay च्या एकाधिकारशाहीला धक्का, आले UPI चे नवीन फीचर
| Updated on: Aug 12, 2023 | 5:14 PM
Share

नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : देशात मोठ्या प्रमाणात युपीआयचा वापर होत आहे. या सेक्टरमध्ये फोनपे आणि गुगलपेची (PhonePe And Google Pay) एकाधिकारशाही वाढली आहे. या दोन एपसह इतर ही एप मैदानात आहेत. पण यांचा बाजारातील वाटा अधिक आहे. तसेच युपीआय पेमेंट करताना अनेकदा नेटवर्क इश्यू वा इतर अनेक कारणांमुळे रिअल टाईममध्ये पेमेंट होत नाही. ते अडकते, अथवा पेमेंट फेलचा मॅसेज येतो. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी सुधारीत युपीआय पेमेंट सिस्टिम एप दाखल होत आहे. राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) त्यासाठी कंबर कसली आहे. या नवीन फीचरला युपीआय प्लगइन (UPI Plugin) सिस्टम असे नाव आहे. त्यामुळे पेमेंट अडकण्याच्या झंझटीतून लवकरच मुक्तता मिळेल. तसेच हा सर्वात मोठा फायदा होणार आहे.

काय आहे युपीआय प्लगइन सिस्टम

युपीआय प्लगइन सिस्टमला ऑनलाईन पेमेंटमधील अडचणी सोडविण्यासाठी बाजारात दाखल करण्यात येत आहे. ऑनलाईन ऑर्डर करताना तुम्हाला पेमेंटसाठी गुगल पे अथवा फोन पे या थर्ड पार्टी एपवर ट्रान्सफर करण्यात येते. अनेकदा पेमेंट होत नाही. ते मध्येच अडकते. ही अडचण दूर होईल.

थर्ड पार्टी एपची गरज नाही

युपीआय प्लगइन सिस्टममुळे ऑनलाईन पेमेंटसाठी थर्ड पार्टी एप्सची गरज उरणार नाही. या नवीन फीचरमुळे ऑनलाईन पेमेंटसाठी व्हर्च्युअल पेमेंट एड्रेसचा वापर करता येईल. त्यामुळे सहज पेमेंट होईल. त्यासाठी थर्ड पार्टी एपची गरज नसेल.

नवीन फीचर कशासाठी?

सध्या ऑनलाईन पेमेंट सेक्टरमध्ये खासगी कंपन्यांचा बोलबाला आहे. गुगल पे आणि फोनपे या कंपन्यांचा दबदबा आहे. ऑनलाइन युपीआई पेमेंटमध्ये सर्वाधिक वाटा फोनपेचा आहे. फोनपेचा वाटा 47 टक्के आहे. तर गुगल पेचा वाटा 33 टक्के इतका आहे. गुगलपे दुसऱ्या क्रमांक आहे. तर पेटीएमचा वाटा 13 टक्के आहे. या दोन कंपन्यांची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी हे नवीन पेमेंट फीचर महत्वाचे ठरेल.

ग्राहकांचा फायदा काय?

युपीआय प्लगइन सिस्टममुळे ऑनलाईन फसवणुकीची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. तर मधातच पेमेंट अडकण्याची अडचण दूर होईल. ऑनलाईन पेमेंटमध्ये तेजी येईल. तर युपीआय प्लगइनमुळे युपीआय पेमेंटची संख्या अजून वाढेल.

इतक्या देशात युपीआयचा डंका

युपीआयद्वारे पेमेंट करता येऊ शकणाऱ्या देशांची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार, भुतान, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, अमेरिका, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, यूनाइटेड किंगडम आणि लवकरच फ्रान्सचा या यादीत समावेश होईल. सर्वात अगोदर भुतानने भारताची युपीआय पेमेंट पद्धत स्वीकारली होती. जुलै 2021 मध्ये भुतानने BHIM App माध्यमातून UPI पेमेंट व्यवहाराला मंजूरी दिली होती.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.