AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रेडिट कार्ड वापरा, पण प्रत्येक ठिकाणी नाही; जाणून घ्या आरबीआयचे नियम

लॉटरीची तिकिटे, स्वीपचे पैसे किंवा कोणत्याही प्रकारच्या सट्टेबाजीच्या खरेदीमध्ये आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत नाही. याशिवाय इतर काही ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करण्यास मनाई आहे. (Use credit cards, but not everywhere; know the rules of RBI)

क्रेडिट कार्ड वापरा, पण प्रत्येक ठिकाणी नाही; जाणून घ्या आरबीआयचे नियम
बँक देत नाही क्रेडिट कार्ड नंबर, मग कोण जारी करतं? जाणून घ्या प्रत्येक क्रमांकाचा अर्थ
| Updated on: Jul 06, 2021 | 10:45 PM
Share

नवी दिल्ली : प्रत्येकाला पैशाचे मूल्य समजते, परंतु सध्याच्या डिजिटल युगात आपल्याला सर्वच ठिकाणी रोख रक्कम घेऊन जाण्याची गरज नाही. आपल्याला आर्थिक व्यवहारांसाठी डेबिट कार्ड, यूपीआयसारखे बरेच पर्याय आहेत. फक्त आपल्या खात्यात पैसे असणे आवश्यक आहे. खात्यात पैसे नसल्यासही चिंतेचे कारण नाही, अशा परिस्थितीत केवळ तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असायला हवे. क्रेडिट कार्ड असेल तर मजा करा, आपल्या गरजा पूर्ण करा, खरेदी करा व खरेदीचे पैसे नंतर द्या. तथापि, बर्‍याच ठिकाणी आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत नाही. (Use credit cards, but not everywhere; know the rules of RBI)

अशा परिस्थतीत तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकत नाही

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आपण बर्‍याच ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लॉटरीची तिकिटे, स्वीपचे पैसे किंवा कोणत्याही प्रकारच्या सट्टेबाजीच्या खरेदीमध्ये आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत नाही. याशिवाय इतर काही ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करण्यास मनाई आहे. आपण फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये देखील क्रेडिट कार्ड वापरू शकत नाही. कॉलबॅक सेवांमध्ये तसेच कोणत्याही प्रकारचे जुगार म्हणजे जुगार संबंधित व्यवहारातही आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत नाही. इतकेच नाही तर कोणतेही प्रतिबंधित मासिक खरेदी करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड वापरू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने (भारतीय रिझर्व बँक) क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अशा प्रकारचे पेमेंट्स करण्यावर बंदी घातली आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या अहवालानुसार एसबीआय कार्डने आपल्या ग्राहकांना ई-मेलद्वारेही यासंदर्भात माहिती दिली आहे.

जाणून घ्या नियम व कायदे

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या अहवालानुसार, परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम,1999 (फेमा) आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार, वर उल्लेख केलेल्या सेवा किंवा उत्पादनांसाठी क्रेडिट कार्डचा वापर करण्यास मनाई आहे. या निर्देशांचे उल्लंघन केल्यास क्रेडिट कार्डधारकास जबाबदार धरून कार्ड स्वतःजवळ ठेवण्यापासून रोखले जाऊ शकते, असे आरबीआयच्या नियमांमध्ये म्हटले आहे. तसेच एसबीआय कार्डच्या वतीने ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये याबाबत ग्राहकांना सावध करण्यात आले आहे. या मेलमध्ये म्हटले आहे कि, बरेच फॉरेक्स ट्रेडिंग व्यापारी, कॅसिनो इ, हॉटेल्स किंवा वेबसाइट्स आहेत, जी उत्पादने व सेवांसाठी क्रेडिट कार्ड पेमेंटचा पर्याय देतात. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. अशा माध्यमातून तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे या भानगडीत न पडण्याचा सल्ला एसबीआयने दिला आहे. (Use credit cards, but not everywhere; know the rules of RBI)

इतर बातम्या

Modi Cabinet Expansion : सहकारातून समृद्धीचं व्हिजन साकार करण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘सहकार मंत्रालया’ची निर्मिती

शेतकऱ्यांना 13 तर राज्याला मिळणार 626 कोटी, पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे सरकारचा फायदा : प्रविण दरेकर

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.