येस बँकेकडून व्याज दरात वाढ; गृह कर्ज, वाहन कर्ज महागले

येस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेकडून आपल्या एमसीएलआरमध्ये वाढ करण्यात आली आहे. व्याज दरवाढीमुळे आता सर्वच प्रकारचे कर्ज महाग होणार आहे.

येस बँकेकडून व्याज दरात वाढ; गृह कर्ज, वाहन कर्ज महागले
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 12:56 PM

मुंबई : येस बँकेंच्या (Yes Bank) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. येस बँकेने आजपासून आपल्या एमसीएलआरमध्ये (MCLR) 15 ते 20 बेसीस पॉईंटची वाढ केली आहे. एमसीएलआरमध्ये झालेल्या वाढीचा परिणाम हा सर्वच प्रकारच्या कर्जावर दिसून येणार आहे. एमसीएलआर वाढवल्यामुळे गृहकर्ज (Home Loan), वाहन कर्ज आणि इतर सर्व प्रकारचे कर्ज महाग होणार आहेत. एमसीएलआर हा कोणत्याही बँकेसाठी संदर्भ दर असतो. त्याच आधारावर गृह कर्जावरील व्याज दर निश्चित केले जाते. एमसीएलआरची सुरुवात 2016 मध्ये भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली. त्यापूर्वी मूळ दराच्या आधारेच होम लोनचा व्याजदर ठरवण्यात येत होता. गेल्या महिन्यात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली. रेपो रेट वाढवण्यात आल्यानंतर जवळपास सर्वच प्रमुख बँकांकडून आपल्या विविध प्रकारच्या कर्जावरील व्याज दर वाढवण्यात आले आहेत.

आयसीआयसीआय बँकेने वाढवले व्याज दर

येस बँकेपूर्वी बुधवारी आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशन बँक या बँकांनी देखील आपल्या एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. तर दुसरीकडे एचडीएफसी लिमिटेडकडून होम लोनच्या रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये पाच बेसीस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. येस बँकेकडून आता नवीन दरानुसार एका दिवसाच्या कर्जासाठी 7.10 टक्के व्याज दर आकारण्यात येणार याहे. एका महिन्यासाठी 7.55, तीन महिन्यांसाठी 7.70 टक्के तर सहा महिन्यांच्या कर्जासाठी 8.50 टक्के इतका व्याज दर आकारण्यात येणार आहे. येस बँकेने एमसीएलआरमध्ये केलेल्या वाढीमुळे ईएमआय देखील महाग होणार आहे.

एमसीएलआर वाढल्यास आर्थिक फटका

एमसीएलआर वाढल्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्याचे सध्या सुरू असलेले कर्ज देखील महाग होते. ईएमआयमध्ये वाढ होते. तुम्ही जेव्हा एखाद्या बँकेकडून कर्ज घेता, तेव्हा त्या कर्जाच्या मोबदल्यात आकारण्यात येणाऱ्या किमान व्याज दराला बेस रेट असे म्हणतात. बेस रेट पेक्षा कमी व्याज दराने कोणत्याही बँकेकडून कर्ज दिले जात नाही. सध्या बसे रेट ऐवजी कर्जाचे दर ठरवताना एमसीएलआरचा ही संकल्पाना वापरण्यात येत आहे. त्यामुळे कुठल्याही बँकेने एमसीएलआरमध्ये वाढ केल्यास आपोआपच कर्ज महाग होते.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.