महायुतीला पाठिंबा देणारे 3 अपक्ष आमदार नाराज, थेट मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली नाराजी

महायुतीला पाठिंबा देणारे 3 अपक्ष आमदार नाराज, थेट मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली नाराजी

Harshada Shinkar | Updated on: Mar 10, 2024 | 5:50 PM

कोल्हापुरातील तीन अपक्ष आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू असून या तीनही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली नाराजी बोलून दाखवली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत सामावून घेतलं नसल्याची केली तक्रार

मुंबई, १० मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही नेत्यांनी आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीला पाठिंबा देणाऱ्या कोल्हापुरातील तीन अपक्ष आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापुरातील तीन अपक्ष आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू असून या तीनही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली नाराजी बोलून दाखवली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत सामावून घेतलं नसल्याची तक्रार या तीनही अपक्ष आमदारांनी केली आहे. तर नाराजी संदर्भात लवकरच वरिष्ठांशी चर्चा करू, असे आश्वासनही धनंजय मुंडे यांनी या तीन अपक्ष आमदारांना दिलं आहे.

Published on: Mar 10, 2024 5:50 PM
Follow Us