मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. ते महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत असून ही भेट महराष्ट्रातील मोठ्या प्रकरणावर घेतली जात आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. ते महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत असून ही भेट महराष्ट्रातील मोठ्या प्रकरणावर घेतली जात आहे. मुंबईतील म्हाडा, एमएमआरडीए तसेच इतर मोकळ्या जागांशी संबंधित विविध प्रश्न मांडण्यासाठी ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
या भेटीबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री मोकळ्या जागा त्यांच्या मित्रांना तसेच आमदार आणि खासदारांना देत असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईतील मोकळ्या जागांचा योग्य वापर आणि त्यांचे संरक्षण याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
यावेळी त्यांनी अंधेरीतील एका प्लॉटचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित प्लॉटबाबतही त्यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला. ही जागा जवळपास सोळा एकर असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतील महत्त्वाच्या जागा अशा पद्धतीने देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रश्नावर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मोकळ्या जागांच्या प्रश्नावर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे मुंबईतील जागांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
