Aditya Thackeray | मोठी अपडेट! आदित्य ठाकरेंनी घेतली पंकजा मुंडेंची भेट, भेटीचं नेमकं कारण समोर…

| Updated on: Apr 30, 2026 | 12:06 PM

राजकीय वर्तुळात नेहमीच मोठमोठ्या घडामोडी घडत असतात. अशात उबाठा शिवसेना पक्षातील आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी इतर काही मान्यवर देखील उपस्थित होते. या सदिच्छा भेटीचे काही फोटो समोर आले असून ही भेट नेमकी का घेण्यात आली हे देखील समोर आलं आहे.

आदित्य ठाकरेंनी अनेक विकास कामांसंदर्भात पंकजा मुंडेंची भेट घेतली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी सोशल मीडिया पोस्टवरून माहिती दिली, त्या म्हणाल्या, ‘नदी प्रदूषणाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार श्री. आदित्य ठाकरे, श्रीमती वंदना चव्हाण हे आज माझ्या रामटेक या निवासस्थानी आले होते, यावेळी प्रदूषणाच्या मुद्द्यावर विस्तृत आणि सकारात्मक चर्चा झाली.’

Published on: Apr 30, 2026 12:06 PM
Follow Us