नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Aug 13, 2026 | 2:27 PM

नागपुरातील टीना आणि तिच्या मैत्रिणींना शाळेत जायला पाहिजे बस. टीना आणि तिच्या मैत्रिणींचा समस्या सांगणारा हा व्हिडिओ जो आहे, तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. नागपूरच्या कुही तालुक्याच्या खेतापूर गावातील विद्यार्थिनींचा हा व्हिडिओ, बससाठीचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.  व्हायरल व्हिडिओतील मुलींशी […]

नागपुरातील टीना आणि तिच्या मैत्रिणींना शाळेत जायला पाहिजे बस. टीना आणि तिच्या मैत्रिणींचा समस्या सांगणारा हा व्हिडिओ जो आहे, तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. नागपूरच्या कुही तालुक्याच्या खेतापूर गावातील विद्यार्थिनींचा हा व्हिडिओ, बससाठीचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.  व्हायरल व्हिडिओतील मुलींशी टिव्ही 9 नं संवाद साधला तेव्हा त्या म्हणाल्या आम्ही त्या व्हिडिओमध्ये अशीच मागणी केलती का आमच्या गावचा रस्ता सुधारून हवा आहे आणि आम्हाला एसटी महामंडळची बस सुरू करून हवी आहे. आम्हाला जाण्या-येण्याचा खूप त्रास आहे. आमची सायकलची पंचर, चकाडग असे वारंवार समस्या येतात आणि आम्हाला जायला पाण्यापावसात खूप त्रास होतो म्हणून आम्हाला एसटी महामंडळ सुरू करून हवं होतं. आम्हाला 7 किलोमीटर जावे लागते रोज. आम्ही पायीच जाते.  सायकल पंक्चर होते. कारण की रस्त्याने गड्डे पडले आहे खूप आणि भीती पण वाटते वाघाची. वाघही सुटले आहे. आम्हाला बस चालू करायचे आहे.  रोज शाळेत पायदळ जातो. पहिले सायकलने जात होतो. सायकलही चोरी गेली. मग आता? आता पायदळ जातो. आमच्या गावात बस नाहीये. आम्ही पैदल शाळेमध्ये जातो. 7 किलोमीटर पाण्यापावसामध्ये. आमची हीच मागणी आहे की बस सुरू झाली पाहिजे.

Published on: Aug 13, 2026 2:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us