मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं…

मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं…

| Updated on: Jun 07, 2026 | 10:22 AM

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ (ABKKS) ही प्रामुख्याने महाराष्ट्रात कार्यरत असलेली एक प्रमुख कामगार संघटना आहे. या संघटनेबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वज्ञ अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ (ABKKS) ही प्रामुख्याने महाराष्ट्रात कार्यरत असलेली एक प्रमुख कामगार संघटना आहे. ही संघटना विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, वेतनासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी लढा देते. मात्र अलीकडेच या संघटनेच्या चिटणीसांना अटक करण्यात आली आहे. संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी महसूल गुप्तचर संचालनालयाची तस्करीविरोधी कारवाई सुरू होती. दरम्यान आचरेकर यांना याच तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून ५ कोटींपेक्षा अधिक किमतीचे सोने जप्त केले आहे. कारवाईत फक्त अजित आचरेकरच नाही तर त्यांच्या काही सहकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस प्रशासन या तस्करी संदर्भातील तपास जलद गतीने करत असून लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 07, 2026 10:19 AM
Follow Us