तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल

तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल

| Updated on: Oct 10, 2026 | 6:15 PM

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी डीएन नगर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यापूर्वी तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने हा प्रकार घडला. यावेळी काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तुषार गांधींची तात्काळ सुटका न झाल्यास महाराष्ट्रात शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे आज डीएन नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यापूर्वी तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ही घटना घडली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. अनिल परब हे देखील आदित्य ठाकरेंसोबत उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. “ही पोलीस स्टेशन आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“रस्त्यावर हे सगळं चिघळण्याच्या आधी पोलिसांनी तुषार गांधींना सोडलं पाहिजे. नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र शिवसैनिक रस्त्यावर उतरेल,” असा इशाराही त्यांनी दिला. तुषार गांधींना आणल्यानंतर, आम्ही इथे यायला निघालो असता पोलिसांनी त्यांना येथूनही नेल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. सध्या डीएन नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात जमावबंदीचे आदेश (कलम १४४) लागू असून शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे.

Published on: Oct 10, 2026 6:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us