Video : पंकजा मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री 6 वर्षांनंतर एकाच मंचावर

Video : पंकजा मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री 6 वर्षांनंतर एकाच मंचावर

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Apr 11, 2023 | 3:04 PM

पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीत नारळी सप्ताहच आयोजन करण्यात आलं होतं. नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे सहा वर्षांनी एकाच मंचावर पाहायला मिळाले.

अहमदनगर : नारळी सप्ताहनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री एकाच मंचावर पाहायला मिळाले. तर याच कार्यक्रमाला राष्ट्रवादी नेते आमदार धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते. तब्बल 6 वर्षांनी पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री एकत्र एकामंचावर पाहायला मिळाले. भारजवाडी फाट्यावर पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत झालं. पंकजा मुंडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. डीजे वाजवत त्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यात आलं. या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. “पंकजा मुंडे जिवंत असेपर्यंत भगवान बाबांच्या गादाला धक्का लागणार नाही. मी गोपीनाथ गड स्थापन केला तो महाराजांच्या हस्ते केला. तुम्ही शिव्या दिल्या तर आम्ही फुले म्हणून डोक्यावर घेऊ. तुम्ही जोड्याने मारेले तरी चालेल”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Published on: Apr 11, 2023 3:03 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us