Ajit Pawar | पुण्यातील काही भाजप नगरसेवक माझ्या संपर्कात : अजित पवार

| Updated on: Sep 17, 2021 | 8:24 PM

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. पुण्यातील काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही, असं अजित पवार म्हणाले.

Follow us on

आगामी महापालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढली जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही अजित पवार यांनी केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या या वक्तव्यानं पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. पुण्यातील काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिली आहे, असं अजित पवार म्हणाले. पालिका हाती असल्यास चांगलं काम होतं, असंही अजित पवार म्हणाले.