सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? अजित दादा स्पष्टच म्हणाले…

सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? अजित दादा स्पष्टच म्हणाले…

Harshada Shinkar | Updated on: Jun 14, 2024 | 4:19 PM

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते उपस्थित नव्हते, यासंदर्भात अजित पवार यांना सवाल केला असता त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी कुणाला बोलावलं नव्हतं, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना पसंती दिली आहे. इतकंच नाहीतर त्यांनी अर्जही दाखल केला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते उपस्थित नव्हते, यासंदर्भात अजित पवार यांना सवाल केला असता त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी कुणाला बोलावलं नव्हतं, असं स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितले. तर अर्ज भरण्यासाठी सगळ्यांनी यावं, असं मला वाटलं नाही, असेही अजित पवार म्हणाले. तर एकनाथ शिंदे यांना रात्री वर्षावर जाऊन भेटलो. उमेदवाराचं नाव आज किंवा उद्या ठरेल असं सांगितलं. सगळ्यांनी फॉर्म भरायला जावं असं मला वाटलं नाही. एकनाथ शिंदे म्हणाले फॉर्म भरुन या. महायुती सोबत आहे. मीच त्यांना बोलावल नव्हतं. तरीही बातम्या चालवल्या महायुतीचे नेते दिसत नाहीयत म्हणून. व्यक्ती दु:खात असताना फॉर्म भरायला चला असं म्हणण योग्य वाटत नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Published on: Jun 14, 2024 4:19 PM
Follow Us