दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी… NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागणीने जोर धरला आहे.प्रशांत किशोर यांनीही सुनेत्रा पवारांना हाच सल्ला दिल्याचे सांगितल्याने हालचालींना वेग आला आहे. आशात आता राष्ट्रावादीतील नेते उमेश पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. याआधी रुपाली ठोंबरे यांनीदेखील मोठं विधान केलं होतं. एकंदरीतच राष्ट्रवादीत वाद-विवाद सुरू झाल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागणीने जोर धरला आहे.प्रशांत किशोर यांनीही सुनेत्रा पवारांना हाच सल्ला दिल्याचे सांगितल्याने हालचालींना वेग आला आहे. अशात आता राष्ट्रावादीतील नेते उमेश पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. याआधी रुपाली ठोंबरे यांनीदेखील मोठं विधान केलं होतं. एकंदरीतच राष्ट्रवादीत वाद-विवाद सुरू झाल्याचं दिसत आहे.
उमेश पाटील म्हणाले, ‘दादांच्या कुटुंबातील सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांचं दैनंदिन जीवन वेगळं होतं. त्यानंतर त्यांचं आयुष्य 360 डिग्री आयुष्य बदललं. त्यानंतर सुनेत्रा पवारांकडे पक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. दादांचा इतका मोठा परिवार सांभाळण्याची जबाबदारी आली. त्यांनी त्यांचाबाबत कधीही विचार केला नव्हता. त्यांना थेटपणे जबाबदारी आली. सुनेत्रा पवार या महिला आहेत. राष्ट्रवादी आणि परिवाराला टार्गेट केलं जातंय. असं माहीत असतानाही राजकीय हेतूने संभ्रम निर्माण होईल, अशा पद्धतीने वातावण निर्मिती केले जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
इकडे मुखाग्निची तयारी सुरू होती, पण दुसरीकडे, त्यापूर्वीच मंत्रीपदासाठी बोलणी सुरू झाली, हे कोणी केलं ते शोधा. असं उमेश पाटील यांनी सांगितलं. ही बाबत समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे.
