अजित पवार यांचा अपघात की घात? सर्वात मोठा पुरावाच असुरक्षित?
अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्समधील डेटा असुरक्षित असल्याची चिंता रोहित पवार आणि अतुल लोंढे यांनी व्यक्त केली आहे. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे वृत्त असून, डेटा रिकव्हरीसाठी तो परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. अपघात होता की घातपात, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, DGCA च्या अहवालाची आणि पारदर्शकतेची मागणी जोर धरत आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताभोवती संशयाचे ढग अजूनही दाटलेले आहेत. या अपघातातील सर्वात मोठा पुरावा मानला जाणारा ब्लॅक बॉक्समधील डेटा असुरक्षित असल्याची शंका आता वाढीस लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स जळाला असून, डेटा रिकव्हरीसाठी तो परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे अपघाताचे नेमके कारण कधीच समोर येणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
चार दिवसांपूर्वी रोहित पवार आणि अतुल लोंढे यांनी ब्लॅक बॉक्सबाबत चिंता व्यक्त केली होती. ब्लॅक बॉक्स हा विमानातला रेकॉर्डर असतो, जो कितीही भीषण आगीतही सुरक्षित राहतो. मात्र, अजित पवारांच्या प्रकरणात तोच ब्लॅक बॉक्स धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. 20 दिवस उलटूनही DGCA चा प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही. त्यामुळे, DGCA ने लवकर अहवाल सादर करून VSR कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
