Ajit Pawar Death : दादा गेले… हे राज्यातील कार्यकर्त्यांना मान्यच नाही…
Ajit Pawar Death In Plane Crash Updates : अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला सलामी दिल्यानंतर अवघ्या ४८ तासांत विमान अपघातात त्यांचे निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येताना धावपट्टीजवळ विमानात बिघाड होऊन भीषण दुर्घटना घडली. कार्यकर्त्यांसह सामान्य लोकांनाही या बातमीवर विश्वास बसला नाही. त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे ते विरोधकांनाही आदरणीय होते.
राज्यातील कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या निधनावर विश्वास बसत नाहीये. प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला सलामी दिल्यानंतर अवघ्या ४८ तासांत एका मोठ्या नेत्याला शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जाईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. अजित दादांच्या अपघाती मृत्यूनंतर कार्यकर्त्यांनी मोठा आक्रोश केला आहे. पवार कुटुंब आणि बारामतीकर सुन्न झाले आहेत. त्यांच्या समर्थकांच्या भावना अनावर झाल्या आहेत.
मुंबईहून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी निघालेले विमान बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वी ८ वाजून ४० मिनिटांनी अचानक बिघडले. धावपट्टी जवळ असतानाच विमानात बिघाड होऊन ते अचानक कोसळले आणि भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत महाराष्ट्राच्या राजकारणातील एका महत्त्वाच्या नेत्याचे दुःखद निधन झाले. अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप असले तरी, ते विलक्षण कार्यशक्तीने झपाटलेले नेते होते, हे त्यांचे विरोधकही मान्य करत असत.
