Vijay Wadettiwar on Ajit Pawar Plane Crash | ब्लॅकबॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला है; वडेट्टीवारांकडून गंभीर आरोप

| Updated on: Feb 17, 2026 | 11:02 AM

राज्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा विमान अपघात होऊन आज जवळपास 20 दिवस पूर्ण झाले असले तरी त्यांच्या मृत्यूबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. हा अपघात होता की घात, याबाबत राज्यासह देशभरात तीव्र चर्चा रंगली आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाले. मात्र, या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी अपघाताच्या कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अधिकृत यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात गंभीर शंका व्यक्त केली आहे. “अजित दादांचा मृत्यू अपघाती वाटत नाही. या घटनेत काहीतरी संशयास्पद आहे,” असे वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केले. तसेच विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे प्रश्न उपस्थित करत, “ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ ‘डाळ में कुछ काला है’ असेच म्हणावे लागेल,” अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.

Published on: Feb 17, 2026 11:02 AM