Ajit Pawar | आमदारांचं निलंबन त्यावेळची सभागृहातील स्थिती पाहून झालेलं – अजित पवार

Ajit Pawar | आमदारांचं निलंबन त्यावेळची सभागृहातील स्थिती पाहून झालेलं – अजित पवार

| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 21, 2021 | 7:49 PM

चहापानावर यापूर्वी सातत्याने बहिष्कार घातल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. प्रत्येक वेळी काही ना काही मुद्दा काढून बहिष्कार टाकायचा हे घडायला नको. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना पत्र लिहून निमंत्रण दिलं होतं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ते कुठला ना कुठला मुद्दा काढून बहिष्कार टाकतात, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली.

मुंबई : गेल्या अधिवेशनात आमदारांचे निलंबन हे सभागृहातील परिस्थिती पाहून झाले होते, त्यात कुठलीही वेगळी भूमिका नव्हती असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला चांगलाच चिमटा काढला. ‘महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ते कुठला ना कुठला मुद्दा काढून बहिष्कार घालत आहेत’, असं अजित पवार म्हणाले.

चहापानावर यापूर्वी सातत्याने बहिष्कार घातल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. प्रत्येक वेळी काही ना काही मुद्दा काढून बहिष्कार टाकायचा हे घडायला नको. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना पत्र लिहून निमंत्रण दिलं होतं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ते कुठला ना कुठला मुद्दा काढून बहिष्कार टाकतात, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us