Akola : लोकांना स्ट्रेस फ्री करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाचंच टोकाचं पाऊल, संपवलं स्वतःचं आयुष्य, कारण काय?

Akola : लोकांना स्ट्रेस फ्री करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाचंच टोकाचं पाऊल, संपवलं स्वतःचं आयुष्य, कारण काय?

Harshada Shinkar | Updated on: Jun 22, 2025 | 8:48 AM

डॉ. प्रशांत जावरकर यांनी आपल्या न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? आत्महत्येमागं नेमकं काय करण होतं? हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अकोल्यातील एका मानसोपचार तज्ज्ञानेच टोकाचं पाऊल उचललं आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य संपवलंय. या घटनेनं अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर हे कामाला होते. त्यांनी आपल्या न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरीच हा टोकाचा निर्णय घेतला. विषारी इजेक्शन घेऊन डॉ. प्रशांत जावरकर यांनी आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

अकोल्यामधील एका रुग्णालयात डॉ. प्रशांत जावरकर हे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून याच हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये तणावात असलेल्या शेकडो लोकांना समुपदेशन करून स्ट्रेस फ्री केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी स्वत:च आत्महत्या केल्याने सगळ्यांना धक्का बसलाय.

Published on: Jun 22, 2025 8:48 AM
Follow Us