Ambadas Danve Exclusive | विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर…

Ambadas Danve Exclusive | विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर…

| Updated on: Apr 29, 2026 | 4:46 PM

राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अंबादास दानवे यांना तिकिट मिळाल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता या सर्व चर्चा केवळ फेक असल्याचे समोर आले आहे.

विधानपरिषदेचे तिकिट मिळाल्यानंतर अंबादास दानवे यांनी आनंद व्यक्त केले आहे. ते म्हणाले, माझी पहिली प्रतिक्रिया, उद्धव जींनी सभागृहात जावं अशी आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका होती. पण त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला पुन्हा सभागृहात जाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मला वाटते. निश्चित मी उद्धव जींचा, पक्षाचा आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराने चालण्याचा आम्ही जो संकल्प केला मला असे वाटते त्याच विचाराचा हा विजय आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. विरोाधी पक्षाची देखली रहीच इच्छा होती. तर मग आता काँग्रेसची भूमिका काय असं विचारताच, दानवेंनी तो प्रश्न थेट धुडकावला अन् ते निघून गेले.

Published on: Apr 29, 2026 4:29 PM
Follow Us