अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी कुटुंबासह बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अमृता फडणवीस यांनी अमित शहांचे औक्षण केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस कुटुंबीयांनी शाह कुटुंबाचे स्वागत केले. गणेशाच्या दर्शनासाठी महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थान वर्षा येथे बाप्पाचे दर्शन घेतले. अमित शहा आज मुंबईत असून, त्यांनी आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी अमित शहा यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि दिविजा यांनी शाह कुटुंबाचे आतिथ्याने स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या विशेष प्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या पत्नीने मनोभावे बाप्पाचे दर्शन घेतले. हा दौरा राजकीय महत्त्वाचा असला तरी, तो गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहात पार पडला.
Published on: Sep 14, 2026 5:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
