अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

| Updated on: Oct 11, 2026 | 11:16 AM

अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. विदर्भाचे कुलदैवत असलेल्या या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. नऊ दिवस विविध कार्यक्रमांसह आकर्षक रोषणाई आणि जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

अमरावतीच्या विदर्भकुलदैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अंबादेवी मंदिरासोबतच एकवीरा मातेच्या मंदिरातही भाविकांनी गर्दी केली आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवासाठी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मंदिराच्या परिसरात मोठी जत्राही भरते. दरवर्षी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आज रविवारची सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी विशेषतः अधिक प्रमाणात दिसून येत आहे. सकाळी चार वाजता आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. या ऐतिहासिक मंदिरात नऊ दिवस भक्तीमय वातावरण राहणार आहे.

Published on: Oct 11, 2026 11:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us