Amravati | माझ्या मर्जीशिवायच… अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात आणखी एक अल्पवयीन मुलीची तक्रार

Amravati | माझ्या मर्जीशिवायच… अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात आणखी एक अल्पवयीन मुलीची तक्रार

| Updated on: Apr 27, 2026 | 12:22 PM

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात ज्या आठ मुलींचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते, त्यापैकी आणखी एका १६ वर्षीय मुलीने स्वतःचा जबाब नोंदवला आहे. यावेळी तिने पोलिसांना संबंधित प्रकरणातील संवेदनशील माहिती […]

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात ज्या आठ मुलींचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते, त्यापैकी आणखी एका १६ वर्षीय मुलीने स्वतःचा जबाब नोंदवला आहे. यावेळी तिने पोलिसांना संबंधित प्रकरणातील संवेदनशील माहिती दिल्याचे समोर आले आहे. जबाब नोंदवताना पीडिने आयान तिच्या मर्जीशिवया स्पर्ष करायाचा असे वारंवार सांगितले. पोलिसांनी इतर पीडितांनाही समोर येऊन तक्रार करण्यास सांगितले आहे. तसेच, त्यांच्या ओळखीची गोपनीयता राखली जाईल असेही सांगितले.

आरोपी आयाजने आतापर्यंत आठ तरुणींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ पुरावे हाती लागले आहेत. मात्र, प्राथमिक तपासात हा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून १८० पेक्षा अधिक तरुणींचे शोषण केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे दिसून आले आहे.

या प्रकरणातील पीडित तरुणी परतवाडा, अमरावती आणि नागपूर परिसरातील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एक आरोपी एमआयएम पक्षाशी संबंधित कार्यकर्ता असल्याची माहितीही पुढे आली आहे

Published on: Apr 27, 2026 12:22 PM
Follow Us