माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!

माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!

| Updated on: Nov 22, 2026 | 4:42 PM

आनंदराज आंबेडकरांनी अजित पवारांबद्दल केलेल्या "असंवेदनशील" वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुष्काळी परिस्थितीवर बोलताना, "पाऊस नाही तिथे अजित दादांना आणून तलाव भरायचे का?" असे ते म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, सूरज चव्हाण यांनी माफीची मागणी करत, अन्यथा महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे.

रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांनी अजित पवारांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. जालना येथे रिपब्लिकन सेनेच्या 28 व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना, आनंदराज आंबेडकरांनी दुष्काळी परिस्थिती आणि पाणी व्यवस्थापनावर आपले मत मांडले. यावेळी त्यांनी, “जिथे पाऊसच पडत नाही तिथे काय अजित दादांना आणायचं का?” असे उपरोधिकपणे म्हटले.

या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी आनंदराज आंबेडकरांच्या वक्तव्याला असंवेदनशील संबोधत तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी आनंदराज आंबेडकरांना तात्काळ माफी मागण्याची मागणी केली आहे. “जर आनंदराज आंबेडकरांनी माफी मागितली नाही, तर त्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही,” असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे. याशिवाय, तटकरे, भुजबळ, संजय राऊत आणि सचिन अहिर या नेत्यांनीही आनंदराज आंबेडकरांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

Published on: Nov 22, 2026 4:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us