Anandrao Adsul | शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवणार

| Updated on: Sep 30, 2021 | 1:55 PM

 शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अडसूळ चार दिवसांपासून गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र त्यांत्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे. आज (गुरुवारी) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमधून शिफ्ट करण्यात आलं आहे.

Follow us on

आनंदराव अडसूळ यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर 27 सप्टेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. ईडीचे अधिकारी चौकशी करत असतानाच आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली. त्यांना लगोलग गोरेगावच्या लाईफलाईन केअरमध्ये अॅडमिट करण्यात आलं. गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आयसीयूमध्ये 4 दिवस उपचार करुनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आता दुसऱ्या हॉस्पिटमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आलाय.