सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?

सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?

| Updated on: Aug 22, 2026 | 12:23 AM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वाघ यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ लवकरच संपत असल्यामुळेच त्या अधिक आक्रमक आणि भाजपप्रती आपली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला अंधारे यांनी लगावला.   अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्या आक्रमकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “कार्यकाळ संपतोय […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वाघ यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ लवकरच संपत असल्यामुळेच त्या अधिक आक्रमक आणि भाजपप्रती आपली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला अंधारे यांनी लगावला.

 

अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्या आक्रमकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?” अशी विचारणा केली. वाघ टॅटूधारी वाघबाई म्हणून सतत आपण किती आक्रमक आहोत किंवा भाजपप्रति किती एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अंधारे म्हणाल्या. महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषा अवगत असताना, वाघ हिंदीत कोणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, याबद्दलही अंधारे यांनी शंका व्यक्त केली. “कदाचित आपण सतत देवाभाऊ, देवाभाऊ केल्यावर राज्यसभेला वर्णी लागेल, असे दिवास्वप्न तर त्यांना पडत नसेल?” असा उपरोधिक सवाल करत, अंधारे यांनी वाघ यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केले. राजकीय वर्तुळात या टीकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Published on: Aug 22, 2026 12:23 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us