देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं खळबळजनक विधान

देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं खळबळजनक विधान

| Updated on: Feb 15, 2026 | 4:25 PM

एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टिपू सुल्तानबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ओवैसी म्हणाले की, टिपूच्या मृतदेहाजवळ राम लिहिलेली सोन्याची अंगठी सापडली होती. तसेच, टिपूने ब्रिटिशांकडून माफी मागितली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेचा संदर्भ देत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला.

एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टिपू सुल्तानच्या इतिहासाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी टिपू सुल्तानने बलिदान दिले, असे ओवैसी यांनी म्हटले आहे. टिपू सुल्तानच्या मृतदेहाजवळ राम लिहिलेली सोन्याची अंगठी सापडली होती, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ओवैसींनी पुढे असेही नमूद केले की, टिपूने तुरुंगातून सावरकरांसारखी माफीची पत्रे लिहिली नाहीत.

ओवैसींनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून प्रश्न विचारला की, टिपूचा मृतदेह दीड तास तसाच पडून होता, ही गोष्ट सत्य नाही का? तसेच, त्याच्या मृतदेहाजवळून राम लिहिलेली सोन्याची अंगठी मिळाली होती, यावर फडणवीस काय म्हणतात, असा सवालही त्यांनी केला. ही अंगठी 2014 मध्ये ब्रिटनमध्ये 14 हजार 400 पाउंडला लिलावात विकली गेल्याचे ओवैसींनी सांगितले. ब्रिटिशांशी लढताना टिपूने हौतात्म्य पत्करले, कारागृहात बसून तुमच्या वीर सारखी सहा-सहा माफीपत्रे त्यांनी लिहिली नाहीत, असेही ओवैसींनी ठामपणे सांगितले.

Published on: Feb 15, 2026 04:25 PM