एकच खळबळ! TMC कार्यालयातच… ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?

एकच खळबळ! TMC कार्यालयातच… ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 16, 2026 | 11:35 AM

पश्चिम बंगालचे माजी उपसभापती आणि टीएमसी नेते आशिष बॅनर्जी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. टीएमसीच्या कार्यालयात त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपसभापती आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी यांच्या संशयास्पद मृत्यूने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. बॅनर्जी यांचा मृतदेह टीएमसीच्याच कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ही घटना समोर आल्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सखोल तपास सुरू केला आहे. बॅनर्जी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी पोलीस विविध दिशेने चौकशी करत आहेत. हा मृत्यू आत्महत्या आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा उलगडा पोलीस तपासातून होईल.

Published on: Aug 16, 2026 11:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us